LSG vs PBKS  esakal
IPL

LSG vs PBKS IPL 2023 : शाहरूख खानची धडाकेबाज फलंदाजी, पंजाबने शेवटच्या षटकात विजय आणला खेचून

अनिरुद्ध संकपाळ

LSG vs PBKS IPL 2023 Live : पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्स विरूद्धचा शेवटच्या षठकापर्यंत उत्कंठा वाढून ठेवाणारा सामना 2 विकेटनी जिंकून सलग दोन पराभवानंतर आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली. लखनौच्या 159 धावांचा पाठलाग करताना पंजाबला आपले 8 फलंदाज खर्ची घालावे लागले होते. अखेर शाहरूख खानने 10 चेंडूत नाबाद 23 धावा करत पंजाबचा विजय खेचून आणला. या विजयासाठी सिंकदर रझाने (Sikandar Raza) देखील धडपड केली. त्याने 41 चेंडूत 57 धावा केल्या. लखनौकडून यदुवीर मार्क वूड आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

लखनौ सुपर जायंट्सचे 159 धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अथर्व तायडे शुन्यावर बाद झाला. यदुवीर सिंगने त्याला बाद केले. त्यानंतर यदुवीरने त्यानंतर प्रभसिमरन सिंगला 4 धावांवर बाद करत पंजाबची अवस्था 2 बाद 17 अशी केली.

यानंतर मॅथ्यू शॉर्टने 22 चेंडूत आक्रमक 34 धावा केल्या. मात्र के गौतमने त्याचा अडसर दूर करत पंजाबला तिसरा धक्का दिला. यानंतर हरप्रीत सिंग भाटियाला क्रुणाल पांड्याने 22 धावांवर बाद करत पंजाबचा सेट झालेला अजून एक फलंदाज माघारी धाडला. दरम्यान, कर्णधार सॅम करन देखील 6 धावा करून रवी बिश्नोईला मोठा फटका मारण्याचा नादात बाद झाला.

पंजाबची पडझड सुरू होती त्यावेळी सिकंदर रझा एका बाजूने धावा करत होता. मात्र त्याला साथ देण्यासाठी आलेला जितेश शर्मा 2 धावा करून बाद झाला. अर्धशतक पूर्ण केलेल्या सिकंदरला साथ देण्यासाठी आता शाहरूख खान क्रिजवर आला होता. मात्र हा चेंडू निर्धाव गेला.

आता 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची गरज होती. स्ट्राईकवर शाहरूख खान होता. त्याने बिश्नोईच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही 2 धावा करत सामना 4 चेंडूत 3 धावा असा आणला. चौथ्या चेंडूवर शाहरूखने चौकार मारत अखेर पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामना 24 चेंडूत 32 धावा असा आला. त्यावेळी आवेश खानने टाकलेल्या 17 व्या षटकात 9 धावा झाल्या. त्यानंतर रवी बिश्नोईने टाकलेल्या 18 व्या षटकात 57 धावा करणारा सिकंदर रझा बाद झाला.

आता सामना 12 चेंडूत 20 धावा असा अटीतटीचा झाला होता. पंजाबच्या सर्व आशा शाहरूख खानवर होत्या. लखनौकडून 19 वे षटक टाकण्याची जबाबदारी मार्क वूडने उचलली होती. मात्र शाहरूख खानने मार्क वूडच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तर हरप्रीत ब्रारने मार्क वूडच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारत सामना 8 चेंडूत 7 धावा असा आणला. मात्र ब्रार 5 व्या चेंडूवर बाद देखील झाला. आता वूडचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रबाडा स्ट्राईकवर आला होता.

तत्पूर्वी, आपल्या होम ग्राऊंडवर विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्जने 159 धावात रोखत सामन्यावर पकड निर्माण केली आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या सॅम करनने 4 षटकात 3 फलंदाज बाद करत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले. लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या.

केएल राहुलच्या 74 धावा, लखनौने केल्या 159 धावा

केएल राहुलने 56 चेंडूत 74 धावा करत लखनौला 150 चा टप्पा पार करून दिला. अखेर लखनौने 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या.

LSG 110/2 (14.1) : केएल राहुलचे दमदार अर्धशतक

पंजाबने लखनौला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर सलामीवीर कायल मेयर्स आणि केएल राहुल यांनी आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना संघाला अर्धशतकी मजल मारून देण्यासाठी 7 षटके वाट पहावी लागली. दरम्यान पंजाबच्या हरप्रीत ब्रारने मेयर्सला 29 धावांवर बाद केले. तर दीपक हुड्डाला सिकंदर रझाने 2 धावांवर माघारी धाडले.

पाठोपाठच्या दोन धक्क्यातून लखनौला कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांनी सावरले. या दोघांनी संघाला शतकी मजल मारून दिली. दरम्यान, केएल राहुलने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT