Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore today match  sakal
IPL

IPL2022: लखनौ-बंगळूरमध्ये आज पाचव्या विजयासाठी लढत रंगणार...

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आजलखनौ सुपर जायंटस्‌ व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या फॉर्ममध्ये असणाऱ्या दोन संघांमध्ये लढत रंगणार

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022: नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आजलखनौ सुपर जायंटस्‌ व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या फॉर्ममध्ये असणाऱ्या दोन संघांमध्ये लढत रंगणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी सहा लढतींमधून चारमध्ये विजय मिळवले असून दोन्ही संघांना प्रत्येकी २ लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. उद्याच्या लढतीत दोन्ही संघ पाचव्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ यंदा छान कामगिरी करतोय; मात्र एका बाबीमध्ये या संघाला सुधारणा करावी लागणार आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस, सलामीवीर अनुज रावत व स्टार खेळाडू विराट कोहली या पहिल्या तीन क्रमांकांवर खेळणाऱ्या फलंदाजांना या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही. या तिन्ही फलंदाजांचे फॉर्ममध्ये येणे या संघासाठी महत्त्वाचे असणार आहे; अन्यथा पुढे जाऊन या फलंदाजांचे अपयश संघासाठी हानीकारक ठरू शकते.

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघामध्ये आगमन झाले आहे. याचा फायदा संघाला झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत त्याने महत्त्वाच्या क्षणी ५५ धावांची खेळी साकारली. या संघाची जमेची बाजू म्हणजे दिनेश कार्तिक. फिनिशर म्हणून तो या मोसमात अगदी चोख भूमिका बजावत आहे. त्याने सहा लढतींमधून १९७ धावा फटकावल्या आहेत. एका हाती त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सामना जिंकून दिला आहे. मॅक्सवेल व कार्तिकचा शानदार फॉर्म संघासाठी मोलाचा ठरणार आहे.

गोलंदाजांचा प्रभावी मारा

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या गोलंदाजांनी या मोसमात आतापर्यंत प्रभावी मारा केला आहे. मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल या चार गोलंदाजांना उद्या लोकेश राहुलच्या सेनेला रोखावे लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचाही भरणा आहे. मॅक्सवेल, हसरंगा, हर्षल यांच्यासोबत शाहबाज अहमद हा अष्टपैलू खेळाडूही या संघात आहे.

राहुलची सेना फॉर्ममध्ये

राहुलचा लखनौ सुपर जायंटस्‌ संघ या मोसमात छान कामगिरी करीत आहे. फलंदाजीत स्वत: राहुल याने २३५ धावांचा पाऊस पाडला आहे. क्विटॉन डीकॉक, अयुष बदोनी, दीपक हुडा व कृणाल पंड्या यांनीही आपली धमक दाखवली आहे. अवेश खान व रवी बिश्‍नोई या भारतीय गोलंदाजांनी ठसा उमटवला आहे. तसेच जेसन होल्डर व मार्कस स्टोयनीस या परदेशी अष्टपैलू खेळाडूंच्या आगमनामुळेही लखनौ सुपर जायंटस्‌ संघ समतोल झाला आहे. उद्याच्या लढतीत या संघाचेच पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT