
शौमिका महाडिकांनी डिबेंचर्सच्या मुद्द्यावर कंबर कसली आणि जनावरांसह ‘गोकुळ’वर मोर्चा काढणार आहेत.
esakal
Highlight Summary Points
डिबेंचर्स रक्कम कपातीविरोधात दूध उत्पादकांचा मोर्चा:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ ने प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या दूध फरक बिलातून सुमारे ४०% रक्कम कपात केली असून, संस्थांची संमती न घेता हा निर्णय घेतल्यामुळे शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे.
संघाकडे प्रचंड ठेवी असूनही कपात:
कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संघाकडे ५१२ कोटी रुपये ठेवी असल्याचे सांगितले, तरीही प्राथमिक संस्थांच्या रकमेवर कपात करण्यात आली. संघाने कपात केलेली रक्कम नियमबद्ध करून परत देण्याची मागणी केली जात आहे.
मोर्च्याद्वारे न्यायाची मागणी:
मोर्चा दूध उत्पादकांच्या न्यायासाठी प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आयोजित केला जात आहे, मोर्चा हिंसक नाही, तर उद्योगातील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणासाठी आहे.
Gokul Milk Politics : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या दूध फरक बिलातून डिबेंचर्सची रक्कम अन्यायकारक व संस्थांना विश्वासात न घेता कपात केली आहे. सुमारे ४० टक्क्यांपर्यंत ही रक्कम कपात केली असून, प्राथमिक संस्थांच्या संमतीशिवाय कपात केली आहे, ही रक्कम नियमात बसवून परत करावी, या मागणीसाठी ‘गोकुळ’ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १६) जिल्ह्यातील दूध संस्था व दूध उत्पादक आपल्या गायी व म्हशींसह शासकीय विश्रामगृहापासून ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. याबाबतची माहिती कावणे येथील केंदारलिंग दूध संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे यांनी आज दिली.