Hardik Pandya RR vs MI Captaincy IPL 2024
Hardik Pandya RR vs MI Captaincy IPL 2024 Esakal
IPL

Hardik Pandya MI Captaincy : प्ले ऑफमध्ये कसं पोहचणार.. मूर्खासारख्या चुका करतात... पांड्याच्या कॅप्टन्सीवर माजी खेळाडू जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya RR vs MI Captaincy IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारी जाम भडकला. त्याने अशा प्रकारे तर मुंबईचं नेतृत्व केलं गेलं तर त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे कठिण होईल असं वक्तव्य केलं.

मनोज तिवारीने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या मैदानावर केलेल्या चुकांचा पाढाच वाचला. हार्दिकनं पहिलं षटक टाकायला येणं ही घोडचूक असल्याचं मत व्यक्त केलं.

मनोज तिवारी म्हणाला की, 'जर तुमच्या संघात जसप्रीत बुमराह आहे तर तुम्हाला पहिलं षटक टाकण्याची गरज काय आहे? बटलरनं गेल्या सामन्यात शतक ठोकलं होतं. जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. तुम्ही तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाला गोलंदाजी देत विकेट घेण्याची संधी शोधली पाहिजे.'

'ज्यावेळी हार्दिक पांड्या गोलंदाजीला येतो अन् त्याला दोन चौकार मारले जातात त्यावेळी नव्या चेंडूची शाईन थोडी कमी होते. त्यामुळे चेंडू स्विंग होण्याची शक्यताही कमी होते. फलंदाजाला याचा फायदा होतो.'

तिवारी पुढे म्हणाला की, 'मला नाही वाटत की अशा मुर्खासारख्या चुका केल्या तर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये दाखल होईल.'

मनोज तिवारीने शेवटी मुंबई इंडियन्सच्या वर्मावर बोट ठेवलं. तो म्हणाला की, अनेक संघांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. गुणतालिकेत ते मुंबईच्या वरती आहेत. पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने आतापर्यंत फक्त 7 सामने खेळले आहेत. ते सध्या सातव्या स्थानावर आहेत.

तिवारी म्हणाला की, 'जर अशाच प्रकारची कॅप्टन्सी सुरू राहिली तर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाऊ शकत नाही. गेल्यावेळी खेळाडू रोहित शर्मासोबत दिसायचं. आता असं वाटतं की मुंबईचे खेळाडू कर्णधार हार्दिकसोबत फारसे दिसत नाहीत.'

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT