Punjab Kings vs Lucknow Super Giants  esakal
IPL

PBKS vs LSG : विराटच्या RCB चा विक्रम थोडक्यात वाचला, राहुलच्या लखनौने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांचा काढला किस

अनिरुद्ध संकपाळ

Punjab Kings vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जच्या गोंलंदाजांची त्यांच्याच घरच्या मौदानावर विक्रमी धुलाई करत 257 धावांचे टार्गेट उभारले. विशेष म्हणजे आयपीएल इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी 2013 मध्ये आरसीबीने सर्वाधिक 263 धावा ठोकल्या होत्या. लखनौ आज हा विक्रम मोडण्यापासून फक्त 6 धावा दूर राहिली. आता लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 77 धावा केल्या. मेयर्सने 53 आणि पुरनने 45 तर आयुष बदोनीने 43 धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर केएल राहुल आणि मेयर्स यांनी धडाकेबाज सुरूवात करत 3 षटकात 40 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर कगिसो रबाडाने केएल राहुलला 12 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. लखनौचा कर्णधार बाद झाल्यानंतर आक्रमक शैलीत फलंदाजी करणाऱ्या कायल मेयर्सने 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने 4 षटकार आणि 6 चौकार लगावत 250 च्या स्ट्राईकरेटने धावा ठोकल्या. यामुळे लखनौने पॉवर प्लेमध्येच 1 बाद 74 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र अखेर रबाडाने पॉवर प्ले संपता संपता मेयर्सची अर्धशतकी खेळी 54 धावात संपवली.

मेयर्स बाद झाल्यानंतर लखनौच्या डावाची सूत्रे आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आपल्या हातात घेतली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचत लखनौला 11 षटकात 136 धावांपर्यंत पोहचवले.

आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांनी 13 व्या षटकातच लखनौला दीडशतकी मजल मारून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी लिम लिव्हिंगस्टोनने फोडली. त्याने आयुष बदोनीला 43 धावांवर बाद केले. आयुषने ही खेळी 24 चेंडूत केली होती. आयुष बाद झाल्यावर आलेल्या निकोलस पूरनने आल्या आल्या दणके देण्यास सुरूवात केली. यामुळे लखनौने 15 षटकात 3 बाद 184 धावा अशी मजल मारली.

मार्कस स्टॉयनिसने 40 चेंडूत 70 धावा चोपल्या. त्याने निकोलस पूरनसमोबत चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे लखनौ आयपीएलच्या इतिहासातील सर्वा मोठी धावसंंख्या उभारण्याच्या जवळ पोहचली होती.

शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीप सिंगने 12 धावा दिल्या. त्यामुळे लखनौने 20 षटकात 5 बाद धावा केल्या. निकोलस पूरनने 45 तर दीपक हुड्डाने 6 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

Shikhar Shingnapur: शिखर शिंगणापूरच्या कळसाला मानाचा ध्वज; ‘हर हर महादेव’चा जयघोष, मध्यरात्री शिवपार्वती विवाह, काय आहे पारंपरिक प्रथा?

Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

SCROLL FOR NEXT