Mark Boucher on Rohit Sharma SAKAL
IPL

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Mark Boucher on Rohit Sharma future with Mumbai Indians : आयपीएल 2024 चा हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एकदम खराब राहिला. हंगाम सुरू होण्याआधी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले. पण फ्रँचायझीचा हा सट्टा पूर्णपणे फसला.

Kiran Mahanavar

Mark Boucher on Rohit Sharma future with Mumbai Indians : आयपीएल 2024 चा हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एकदम खराब राहिला. हंगाम सुरू होण्याआधी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले. पण फ्रँचायझीचा हा सट्टा पूर्णपणे फसला. मुंबई इंडियन्सची मोहीम या हंगामातील दहा पराभवांसह संपुष्टात आली आहे.

यादरम्यान धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आयपीएलचा पुढचा सीझन मुंबई इंडियन्ससाठी खेळणार की फ्रँचायझी सोडणार हा प्रश्न सर्वाधिक उपस्थित केला जात आहे. आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी रोहितच्या भवितव्याबाबत मौन तोडले असून माजी कर्णधाराशी याबाबत काय चर्चा झाली ते सांगितले.

रोहितला संघासोबतच्या भवितव्याबद्दल विचारले असता बाउचर म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर रोहितच्या भविष्याबाबत फारशी चर्चा झाली नाही. या हंगामाचा थोडासा आढावा घेण्यासाठी मी त्याच्याशी बोलो आणि मी त्याला विचारले, तू पुढे काय विचार करत आहेस?

यावर रोहित म्हणाला की, मी टी-20 वर्ल्ड कपबद्दल विचार करत आहे, जे योग्य आहे. माझ्यासाठी रोहित स्वतःच्या नशिबाचा मालक आहे. आणि पुढील हंगामासाठी एक मोठा लिलाव होणार आहे आणि काय होणार आहे हे कोणालाही माहिती नाही.

नुकताच रोहित शर्मा आणि केकेआर स्टाफ मेंबर अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये रोहित अभिषेक नायरसोबत मुंबई इंडियन्समध्ये होत असलेल्या बदलांबद्दल आणि त्याच्या भविष्याविषयी बोलत होता.

व्हिडिओमध्ये रोहित अभिषेक नायरला सांगत आहे की, प्रत्येक गोष्ट बदलत आहे, हे त्याच्यावर अवलंबून आहे, मी हे मंदिर बांधले आहे. शेवटी रोहित म्हणतो, भाऊ माझ्यासाठी हे शेवटचे आहे.

या हंगामात रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय असेल, पण तो आयपीएल 2024 मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहितने 14 डावात 32.07 च्या सरासरीने 427 धावा केल्या ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT