LPL Auction Matheesha Pathirana Create History  esakal
IPL

Matheesha Pathirana : IPL कामगिरीवर LPL मध्ये कमाई! इतिहास रचणाऱ्या पथिरानाला CSK पेक्षा मिळाले 80 लाख रूपये जास्त

अनिरुद्ध संकपाळ

LPL Auction Matheesha Pathirana Create History : सध्या चेन्नई सुपर किंग्जचा बेबी मलिंगा मथिशा पथिरानाला चांगले दिवस आले आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून दमदार कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याची वर्णी श्रीलंकेच्या टी 20 वर्ल्डकप संघात देखील लागली आहे.

आता त्याने लंका प्रीमियर लीगच्या लिलावात इतिहासच रचला. तो लंका प्रीमियर लीगच्या चार वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे कोलंबो स्ट्राईकर्सने त्याला सीएसकेपेक्षा 80 लाख रूपये जास्त दिले आहेत.

पथिरानावर छप्पर फाड के बोली

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2024 मध्ये पथिरानाने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 6 सामन्यात फक्त 7.68 च्या इकॉनॉमीने धावा देत 13 विकेट्स घेतल्या आहेत. इतकी चांगली कामगिरी करणाऱ्या पथिरानाला सीएसकेने मात्र 20 लाख रूपयातच आपल्या गळाला लावलं होतं.

मात्र लंका प्रीमियर लीगमध्ये त्याच्यावर छप्पर फाड के बोली लागली. त्याला कोलंबो स्ट्रायकर्सने तब्बल 1 कोटी रूपयात खरेदी केलं. कोलंबो स्ट्रायकर्सने पथिरानासाठी चेन्नईपेक्षा 80 लाख रूपये जास्त मोजले. पथिरानासाठी बोली 41.65 लाखापासून (50 हजार US डॉलर्स) सुरू झाली.

त्याला संघात घेण्यासाठी गाले मार्व्हल्स आणि कोलंबो स्ट्रायकर्समध्ये स्पर्धा लागली होती. शेवटी तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली 1 लाख 20 हजार US डॉलर्समध्ये कोलंबो स्ट्रायकर्सचा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

SCROLL FOR NEXT