Mayank Agarwal out of Team India sakal
IPL

आधी टीम इंडियातून नंतर कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर! आता या दिग्गज खेळाडूची IPL कारकीर्दही धोक्यात

भारताचा अनुभवी फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यातही ठरला फ्लॉप त्यामुळे...

Kiran Mahanavar

IPL 2023 Mayank Agarwal : आयपीएल 2023च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद सर्वात जास्त पैसे घेऊन उतरले आणि त्यांनी त्यांची फलंदाजी मजबूत करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. पण आतापर्यंत फ्रँचायझीला त्याचा फायदा होताना दिसत नाही. सांघिक गुणतालिकेत हैदराबाद दहाव्या स्थानावर आहे. संघाने पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. काल लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 5 विकेट्सने सहज पराभव केला.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. पण संघाला 20 षटकांत केवळ 121 धावा करता आल्या. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाने हे लक्ष्य 5 गडी गमावून पूर्ण केले. यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी आतापर्यंत अपयशी ठरली आहे.

भारताचा अनुभवी फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप ठरला. या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून बाहेर करण्यात आला. अलीकडेच या खेळाडूला केंद्रीय कराराच्या यादीतूनही वगळण्यात आले आणि आता या दिग्गज खेळाडूच्या आयपीएल कारकिर्दीलाही धोका निर्माण झाला आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर मयंक अग्रवालला IPL 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध डावाची सुरुवात करताना मयंक अवघ्या 7 चेंडूत 8 धावा करून तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मयंकही 23 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. आगामी सामन्यांमध्ये मयंकने अशीच निराशाजनक कामगिरी दाखवली तर त्याला आयपीएलमधूनही बाहेरला केले जाऊ शकते.

बीसीसीआयने नुकतीच वार्षिक करार यादी जाहीर केली. या यादीत मयंक अग्रवालचे नावही नव्हते. मयंकची गेल्या वर्षीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी केली होती. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर पडत आहे. त्याच्या अनुपस्थितीत शुभमन गिलने अव्वल क्रमवारीत चांगली कामगिरी केली आहे. त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी आहे. पण पुढचा रस्ता अवघड दिसत होता.

मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादने IPL 2023 साठी 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या मोसमात तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता. पण त्याची आणि संघाची कामगिरी खराब होती. यानंतर पंजाबने त्याला सोडले आणि शिखर धवनला कर्णधार बनवले. आता सनरायझर्स हैदराबादसाठीही त्याची बॅट शांत आहे. हे मौन आणखी सामन्यांपर्यंत कायम राहिल्यास मयंकच्या अडचणी वाढू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Winter Fashion: हिवाळ्यात 'कम्फर्ट' आणि 'स्टायलिश' राहायचंय? मग स्मिता शेवाळेच्या खास टिप्स फॉलो करा!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

SCROLL FOR NEXT