Lucknow Super Giants vs Mumbai Indians Sakal
IPL

LSG vs MI: लखनौविरुद्ध सामन्याआधी मुंबईचं टेंशन वाढलं! IPL 2024 मधील सर्वात वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज

Mayank Yadav: मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या मैदानावर सामना खेळण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सला एक चांगली बातमी मिळाली आहे. मात्र त्यामुळे हार्दिक पांड्या ब्रिगेडचे मात्र टेंशन वाढले आहे.

Pranali Kodre

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात मंगळवारी (30 एप्रिल) सामना होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी लखनौ संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे, मात्र मुंबईचे टेंशन वाढले आहे.

लखनौचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाजा मयंक यादव पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याला गेल्या काही सामन्यांना दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण आता तो पूर्ण तंदुरुस्त झाला असून त्याने सर्व फिटनेस टेस्टही पूर्ण केल्या आहेत.

खरंतर लखनौ गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या पुनरागमनाच्या प्रतिक्षेत होते. पण अखेर तो तंदुरुस्त झाल्याने लखनौला दिलासा मिळाला असेल.

त्याच्या तंदुरुस्तीबाबत लखनौचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नो मॉर्केलने सामन्याच्या पूर्वसंध्येला माहिती दिली आहे. त्याने सांगितले की 'मयंक फिट आहे. त्याने सर्व फिटनेस टेस्ट पास केल्या आहेत. तो गोलंदाजीसाठी उत्सुक आहे. आशा आहे की उद्या तो अंतिम 12 संघाचा भाग असेल.'

मयंक गेल्या काही दिवसात नेट्समध्येही गोलंदाजी करताना दिसला आहे. त्याच्यावर मॉर्केलसह संघाचा कर्णधार केएल राहुलही लक्ष ठेवून होता.

मयंकने यंदाच्या हंगामातील पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीची चुणूक सर्वांना दाखवली होती. त्याने 3 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कारही जिंकला होता. त्याने नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यातही 3 विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या स्नायुंमध्ये ताण आल्याने त्याला पुढील काही सामन्यांना मुकावे लागले. आता तो मुंबईविरुद्ध पुनरागमन करणार का हे पाहावे लागेल.

दरम्यान, मयंकने जे तीन सामने खेळले, त्यात त्याने सातत्याने साधारण ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी केली होती. तो यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकणाराही खेळाडू आहे. त्याने बेंगळुरूविरुद्ध ताशी 156.7 किमी वेगाने एक चेंडू टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT