Mayank Yadav Injured sakal
IPL

IPL 2024 : मॅचच्या काही तासाआधी लखनौला मोठा धक्का! 'स्पीड गन' म्हणून ओळखला जाणार पठ्ठ्या दोन सामन्यांमधून बाहेर

Mayank Yadav : लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुढील दोन सामने खेळू शकणार नाही.

Kiran Mahanavar

Mayank Yadav : लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुढील दोन सामने खेळू शकणार नाही. लखनऊचा सामना शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सशी होईल आणि त्यानंतर ते 14 एप्रिलला कोलकातामध्ये खेळणार आहे. लखनौचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी 19 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मयंक पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

प्रशिक्षक लँगर म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की तो 19 एप्रिलपर्यंत तंदुरुस्त होईल. त्याने प्रत्येक सामना खेळावा अशी आमची इच्छा आहे. तो खूप मेहनत घेत आहे, पण दिल्लीविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये पदार्पणातच मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंकने रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध ओव्हर टाकल्यानंतर मैदान सोडले.

लँगर पुढे म्हणाले की, "गुजरात विरुद्धच्या सामन्यात एक ओव्हर टाकल्यानंतर त्याला हिप स्टिफनेसची समस्या जाणवली. यानंतर आम्ही त्यांची एमआरआय चाचणी केली, ज्यामध्ये थोडी सूज दिसून आली. तो लवकरच मैदानावर परत येईल अशी आम्हाला आशा आहे."

मयंक यादवने आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्ससाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने फक्त 3 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट देखील उत्कृष्ट 6.00 आहे.

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू मयंक यादव फेकला होता. मयंकने ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी केली. या वेगामुळे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT