Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Rohit Sharma  
IPL

MI vs KKR IPL 2023: रोहित शर्माच्या संघासमोर सातत्य राखण्याचे आव्हान! मुंबईसमोर आज कोलकाताचा अडथळा

पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कसाबसा विजय मिळवला या तुलनेत...

सकााळ वृत्तसेवा

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2023 : दिल्लीविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील आपली मोहीम सुरू केली खरी, परंतु आज घरच्या मैदानावर त्यांना ताकदवान कोलकाता नाईट रायडर्सचा अडथळा पार करणे आव्हानात्मक असणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर दुपारी होणार आहे.

आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपदे मिळवलेली असली तरी मुंबईची गाडी नेहमीच धक्कास्टार्ट अशीच राहिलेली आहे. यंदाही पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कसाबसा विजय मिळवला. या तुलनेत कोलकताने चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभव झाले असले, तरी त्यांची कामगिरी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी राहिलेली आहे, त्यामुळे आज मुंबई संघासाठी विजय सोपा नसेल.

कोलकता संघ तीन दिवसांत दुसरा सामना खेळणार आहे. याचा ताण त्यांच्यावर असला तर त्यांनी निर्माण केलेला दरारा मुंबईच्या संघावर दडपण वाढवणारा आहे. रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूरसारखे फलंदाजही कोणत्याही परिस्थितीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बागळून आहे, त्यामुळे मुंबई संघाला क्षणोक्षणी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकताचा हैदराबादकडून पराभव झाला, परंतु २२८ धावांचे लक्ष्य गाठण्याचे धैर्य त्यांनी दाखवले होते. आता जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांत खेळलेला नाही. तो पुढे कधी खेळेल याबाबत काही स्पष्ट केले जात नाही.

  • आजचा सामना - मुंबई इंडियन्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

  • ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई

  • वेळ ः दुपारी ३.३० पासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT