Michael Vaughan Statement About Hardik Pandya Future Captain Of India  ESAKAL
IPL

'भारताला दोन वर्षात कर्णधाराची गरज लागली तर पांड्या असेलच'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनने (Michael Vaughan) आयपीएल टायटल विजेत्या हार्दिक पांड्याबद्दल (Hardik Pandya) मोठं वक्तव्य केलं आहे. वॉगनने हार्दिकच्या कॅप्टन्सीची ट्वीट करून स्तुती केली आहे. हार्दिक पांड्याने आयपीएल फायनलमध्ये गोलंदाजीत 3 विकेट आणि फलंदाजीत 34 धावा करून गुजरात टायटन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव केला.

गुजरात टायटन्सच्या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनने ट्विट केले. 'नवख्या फ्रेंचायजीची दमदार कामगिरी... जर भारताला येत्या दोन वर्षात कर्णधाराची गरज लागलीच तर तो हार्दिक पांड्याच असेल' (Future Captain Of India)

सध्या तीनही फॉरमॅटमध्ये भारताच्या नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. त्याने नेतृत्वाची धुरा विराट कोहलीकडून आपल्या खांद्यावर घेतली आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या 28 वर्षाच्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वगुणांचे कौतुक अनेक आजी आणि माजी खेळाडूंनी केले आहे. यात सुनिल गावसकर आणि गुजरात टायटन्सचे मेंटॉर गॅरी कर्स्टन यांचा देखील समावेश आहे.

हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात 487 धावा आणि 8 विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात तर गुजरातने राजस्थानला 130 धावात रोखले. त्यानंतर हार्दिकने 34 धावांची महत्वाची खेळी करून गुजरातला विजयी मार्गावर पोहचवले. त्यानंतर शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 32 धावा करत 131 धावांचे आव्हान 18.1 षटकात पार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Shivaji University Protest Violence : ब्रेकिंग! शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिस-विद्यार्थींमध्ये झटापट, घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

SCROLL FOR NEXT