Mitchell Starc IPL 2024 Marathi News 
IPL

Mitchell Starc IPL 2024 : गंभीरचा निर्णय शाहरुख खानच्या खिशाला चटका! स्टार्कच्या एका चेंडूसाठी द्यावे लागणार ७ लाख रुपये

Kiran Mahanavar

Mitchell Starc IPL 2024 News : तब्बल आठ वर्षांनंतर आयपीएलमध्ये यंदा ‘तो’ पहिला चेंडू टाकणार आहे; पण त्याअगोदरच ‘तो’ सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. कुबेराचा खजिना उघडलेला ‘तो’ खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क!

मिनी लिलावात त्याच्यासाठी कोलकता नाईट रायडर्सने तब्बल 24.75 कोटींची बोली लावली. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला 20.25 कोटी रुपये देण्यात आले. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने आणि कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

येत्या आयपीएलसाठी दुबईत उर्वरित खेळाडूंसाठी झालेला लिलाव अभूतपूर्व ठरला आणि त्यात एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे दोन खंदे वेगवान गोलंदाज कमालीचा भाव खाऊन गेले. पहिला शेर, तर दुसरा सव्वाशेर अशी स्थिती होती.

पॅट कमिन्सने 20.50 कोटींची बोली जिंकल्यानंतर काही वेळातच मिचेल स्टार्कसाठी कोणीही अपेक्षित न केलेला 24.75 कोटींचा वर्षाव झाला. ऑस्ट्रेलियाच्या या दोन वेगवान गोलंदाजांनी मिळून 45.25 कोटी मिळवले. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 18.50 कोटी ही सर्वाधिक बोली लागलेली किंमत होती. गतवेळच्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनला ही रक्कम पंजाब संघाने दिली होती. 20 कोटींची किंमत मिळेल, असे कोणी अपेक्षित केले नव्हते.

समजा स्टार्कने लीग स्टेजचे सर्व 14 सामने खेळले आणि एका सामन्यात पूर्ण चार षटके म्हणजे 24 चेंडू टाकले, तर तो अंदाजे 336 चेंडू टाकेल. आणि यानुसार पाहिले तर त्याला एका चेंडूसाठी 7 लाख 36 हजार 607 भारतीय रुपये मिळतील. जर कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचला आणि 16 सामने खेळला तर ही किंमत 6 लाख 44 हजार रुपयांपर्यंत जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईतील बोगस स्टे ऑर्डर प्रकरण

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT