Team India Latest Marathi news, Cricket News in Marathi
Team India Latest Marathi news, Cricket News in Marathi sakal
IPL

विराटचा फॉर्म गेल्यावर पाकिस्तानी होतायत खुश, भविष्यवाणी ठरतीय खरी

Kiran Mahanavar

virat kohli : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा काळ खूप वाईट जात आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता आपली विकेट वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये विराट पूर्णपणे फ्लॉप राहिला आहे. त्यामुळे तो यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा भाग असेल की नाही, हे येणारा काळच सांगेल. दरम्यान कोहलीच्या फॉर्मबाबत माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मुहम्मद आसिफचा एक जुना व्हिडिओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कलंकित आसिफने म्हटले होता की एकदा का विराट कोहली फॉर्म गेला तर तो फॉर्ममध्ये परत येऊ शकणार नाही.(mohammad asif comments about virat kohli comeback)

नोव्हेंबर 2019 नंतर कोहलीने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक केले नाही. त्याचा फॉर्म हा कायम त्याच्या चिंतेचा विषय राहिला आहे. कोहलीला आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहली शेवटच्या काही सामन्यात तीनदा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहलीच्या खराब फॉर्मबाबत असिफचा 2021 चा व्हिडिओ आता इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने कोहलीची भविष्यवाणी केली होती.(Team India Latest Marathi news)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ त्याच्या कारकिर्दी कायम वादात सापडली आहे. फिक्सिंगचा सामना करणाऱ्या कलंकित आसिफने धक्कादायक भविष्यवाणी केले होते, आणि ती कोठे तरी खरी ठरत आहे. कलंकित मोहम्मद आसिफने आधीच टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म जाण्याचा अंदाज लावला होता. मोहम्मद आसिफ म्हणाला होता की विराट कोहली फक्त त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. एकदा का विराट कोहली फॉर्म गेला तर तो फॉर्ममध्ये परत येऊ शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT