IPL 2023 MS Dhoni 
IPL

IPL 2023 MS Dhoni : चेन्नईचा पराभव पहिल्या चेंडूवरच ठरला होता? धोनी काय म्हणाला...

या गोष्टीने CSK कडून हिसकावून घेतला विजय

Kiran Mahanavar

IPL 2023 MS Dhoni CSK vs KKR : आयपीएल 2023 मधील लीग टप्पा शेवटच्या आठवड्यात आला आहे, तरी आजुन एक पण संघ प्लेऑफमध्ये गेला नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या तिकिटाकडे लक्ष देत आहे. एका विजय-पराभवाने सर्व समीकरणे बदलत आहेत. असेच काहीसे आयपीएलच्या 61 व्या सामन्यात पाहायला मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह केकेआरने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आणि प्लेऑफमधील पहिला संघ होण्याचे सीएसकेचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

कोलकाता नाईट रायडर्सने 145 धावांचे लक्ष्य 9 चेंडूत 4 गडी गमावून पूर्ण केले आणि सामना 6 गडी राखून जिंकला. सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने पराभवाचे कारण सांगितले. तो म्हणाला, “दुसऱ्या डावात ज्या क्षणी आम्ही पहिला चेंडू टाकला, तेव्हा आम्हाला कळले होते की आम्हाला 180 धावांची गरज आहे. मात्र या विकेटमध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीत 180 धावा करू शकलो नाही. दवने दुसऱ्या डावात मोठा फरक पडला. आम्ही आमच्या कोणत्याही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही.

पराभवानंतरही धोनीने संघातील शिवम दुबे आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचे कौतुक केले. CSK कर्णधार म्हणाला, “आजच्या सामन्यात शिवमने जे केले त्यामुळे मी खूप खूश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो समाधानी राहत नाही आणि सतत सुधारणा करत राहतो. चहरने चेंडू स्विंग केला. त्यानुसार तो गोलंदाजी करतो. त्याला वेगळे काही सांगायची गरज नाही.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉकच्या घरच्या मैदानावर सीएसकेला 6 विकेट्सवर 144 धावाच करता आल्या. शिवम दुबेने 34 चेंडूत 48 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने 20 धावा दिल्या.

प्रत्युत्तर देताना केकेआरची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पॉवरप्लेमध्येच 3 बळी घेतले. यानंतर कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत केकेआरला विजय मिळवून दिला. नितीश 44 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 57 धावा करून नाबाद परतला. रिंकू सिंगने 54 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT