MS Dhoni | CSK  Sakal
IPL

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2024 मधील प्रवास थांबला आहे. चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरले.

Pranali Kodre

IPL 2024, RCB vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या 68 व्या सामन्यात शनिवारी (१८ मे) चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 27 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह चेन्नईचं आयपीएल 2024 मधील आव्हानही संपुष्टात आले आहे.

दरम्यान, बंगळुरूचा संघ विजयाचा आनंद साजरा करत असताना, चेन्नईच्या संघात मात्र निराशा पसरली. चेन्नईच्या डगआऊटमध्ये एमएस धोनीसह सर्वच खेळाडू अत्यंत निराश दिसून आले.

चेन्नईने यंदाच्या हंगामात 14 सामन्यांत 7 विजय आणि 7 पराभव स्विकारले. त्यामुळे त्यांचे 14 गुण झाले. मात्र बंगळुरूनेही 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले, पण त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असल्याने त्यांनी चौथा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

चेन्नईने खेळलेल्या 15 आयपीएल हंगामांपैकी 12 हंगामात प्लेऑफ गाठली आहे, तर तिसऱ्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे.

धोनीचा शेवटचा सामना?

दरम्यान, हा आयपीएल हंगाम चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता हा सामना धोनीचा अखेरचा सामना ठरला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

धोनी आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. त्याने नेतृत्वाची जबाबदारी युवा ऋतुराज गायकवाडच्या हाती सोपवली होती. त्यामुळे आता धोनी या हंगामानंतर पुढेही खेळण्याचा निर्णय घेणार की त्याची कारकि‍र्दची अखेर करणार, हे पाहावे लागणार आहे.

धोनीने त्याच्या आयपीएल कारकि‍र्दीत 264 सामने खेळले असून 24 अर्धशतकांसह 5243 धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षण करताना 148 झेल आणि 42 यष्टीचीत केले.

चेन्नईचा पराभव

शनिवारी झालेल्या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या होत्या. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. तसेच विराट कोहलीने 47 धावा केल्या, तर रजत पाटिदारने 41 धावांची खेळी केली.

चेन्नईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटेनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या. चेन्नईकडून रचिन रविंद्रने 37 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेने 33 धावांची, तर धोनीने 25 धावांची खेळी केली.

बंगळुरूकडून गोलंदाजी करताना यश दयालने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT