IPL 2022 | MS Dhoni Bowling Today
IPL 2022 | MS Dhoni Bowling Today  sakal
IPL

IPL 2022: काय सांगता! धोनी आजच्या सामन्यात करणार गोलंदाजी?

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आज रविवारी डबल हेडर खेळला जात आहे. हा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाणार आहे. सामन्यात रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या आमनेसामने असणार आहे.(MS Dhoni Bowling Today)

चेन्नई आणि गुजरात संघाने सामन्यासाठी पूर्व तयारी केली आहे. सर्व खेळाडू आपापल्या संघाच्या नेटमध्ये सराव करताना दिसले. यादरम्यान चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका वेगळ्याच अवतारात पाहिला मिळेला असून, धोनी चक्क गोलंदाजी करताना दिसला आहे. धोनीचा हा व्हिडिओ चेन्नई फ्रँचायझीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

धोनीने पहिल्याच सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर धोनीची बॅट परत या हंगामात चालू शकली नाही. चेन्नईचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होता. ज्यामध्ये धोनीने नाबाद 50 धावा केल्या. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. धोनीने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यात त्याने 92 धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले आहे. त्यापैकी चेन्नईला फक्त एकच सामना जिंकता आला. चारमध्ये सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. चेन्नईचा संघ या हंगामात सलामीला सलग 4 सामने हरला होता. यानंतर पाचव्या सामन्यात चेन्नई संघाने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) 23 धावांनी पराभव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT