MS Dhoni 
IPL

MS Dhoni : फक्त IPL ट्रॉफी नाही जिकंली, तर धोनीच्या CSK ने घातला शेअरमार्केटमध्ये राडा, गुंतवणूकदार झाले मालामाल

Sandip Kapde

महेंद्रसिंग धोनीच्या CSK ने आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सला नमवत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. क्रिकेट विश्वात फक्त एकच नाव चर्चेत आहे. ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

गेल्या पाच वर्षात महेंद्रसिंग धोनीची कमाई देखील वेगाने वाढली आहे. याच वेगात CSK स्टॉक्सने अनलिस्टेड मार्केटमध्येही तेजी आणली आहे. हा स्टॉक पाच वर्षांत १५ पट वाढला आहे.

CSK जानेवारी २०२२ मध्ये भारतातील पहिले युनिकॉर्न स्पोर्ट्स एंटरप्रायझेस बनले. जेव्हा बीसीसीआयने लखनौच्या दोन फ्रँचायझी विकल्या. लखनौ RPSG ग्रुपला आणि अहमदाबाद कॅप्री ग्लोबलला अनुक्रमे ७,०९० कोटी आणि ५,६२५ कोटी रुपयांना विकले गेले.

धोनीसह CSK मधील इतर खेळाडू देखील चांगली कमाई करतात. गेल्या १६ हंगामात आयपीएलमधून १७८ कोटी रुपये कमावले आहेत. CSK ने त्यांच्या गुंतवणूकदारांवर देखील पैशांचा वर्षावर केला आहे. अनलिस्टेड मार्केटींगमध्ये जिथे प्री आयपीओ स्टॉकची खरेदी केली जाते. तिथे कंपनीचा शेअर १६० - १६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. CSK चे समभाग (CSK शेअर) २०१८ साली इंडिया सिमेंट्सपासून वेगळे करण्यात आले.

जेव्हा CSK चे शेअर्स इंडिया सिमेंट्समधून डिमर्ज केले गेले तेव्हा इंडिया सिमेंट्सच्या स्टॉकहोल्डर्सना १:१ च्या प्रमाणात शेअर्स मिळाले. त्यावेळी एका शेअरची किंमत १२-१५ रुपये होती. यानंतर देशात कोरोना महामारीच्या काळातही किमंत ४८-५० रुपयांपर्यंत वाढली होती.

CSK चे मूल्य सुमारे ९,४४२ कोटी रुपये आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी, कंपनीने निव्वळ महसुलात ३८ टक्के वाढ नोंदवली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान स्पोर्ट्स लीग म्हणून उदयास आली आहे. नवीन मीडिया अधिकारांचा लिलाव आणि गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन नवीन संघांचा समावेश झाल्यामुळे ब्रँड व्हॅल्यू ८.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT