ms dhoni fan came in ground to meet 
IPL

एमएस धोनीला भेटण्यासाठी चाहता लाईव्ह मॅचमध्ये घुसला पाहा VIDEO

कालच्या सामन्यादरम्यान धोनीची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

Kiran Mahanavar

आयपीएलचा 68 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज याच्यात खेळाला गेला. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर सीएसकेने राजस्थानसमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीची फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपलेली नाही. लहान असो वा मोठा प्रत्येकाला धोनीचे वेड आहे. दरम्यान सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान धोनीची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

11व्या षटकात अंबाती रायुडू बाद झाल्यानंतर धोनी मैदानात फलंदाजीसाठी येत होता. त्यानंतर त्याचा एक चाहता 7 नंबरची जर्सी घालून मैदानात आला. त्याने केवळ मैदानातच प्रवेश केला नाही तर धोनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही सुरू केला. मात्र न्यूझीलंडचे पंच ख्रिस गॅफनी त्या चाहत्यासमोर भिंतीसारखे उभे राहिले. चाहत्याला धोनीपर्यंत पोहोचू दिले नाही. तरीही पण कॅप्टन कूलला इतक्या जवळून बघून त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

लाइव्ह मॅचदरम्यान धोनीसाठी फॅन मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही, अशी माहिती आहे. याआधीही चाहत्यांना अनेक प्रसंगी असे करताना दिसले आहे. आयपीएल 2022 मध्ये चेन्नईचा प्रवास संपला आहे. CSK प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचवेळी धोनीला मैदानावर पाहणे ही आयपीएल सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली पोलिस तपासातील माहिती

Pune Crime : बाजीराव रस्त्यावर भरदिवसा थरार; तरुणाचा कुकरीने वार करून खून

'ठरलं तर मग' मध्ये अखेर अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री; 'हा' अभिनेता साकारतोय सुभेदारांच्या जावयाची भूमिका, चेहरा समोर

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

SCROLL FOR NEXT