ms dhoni interacting with with srh players after csk vs srh match win hearts video viral ipl 2023  
IPL

Viral Video : सामन्यानंतर भरली धोनी मास्तरांची शाळा; हैद्राबादच्या खेळाडूंनी घेतलं ज्ञान

रोहित कणसे

आयपीएल २०२३ धूम सध्या पाहायला मिळत आहे, या आयपीएल सामन्यांमध्ये खेळाडूना एकमेकांसोबत चर्चा करण्याची संधी मिळते. अनेक सीनियर खेळाडू युवा खेळाडूंसोबत आपले अनुभव शेअर करताना दिसतात. एमएस धोनीने ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू केली होती.

शुक्रवारी जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ मधील २९ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यानंतर सनरायजर्सच्या टीममधील खेळाडूंनी देखील धोनीकडून क्रिकेटचे धडे गिरवल्याचे पाहायला मिळाले.यावेळी उमसान मलिक, अब्दुल समद यांच्यासह हैद्राबाद संघातील खेळाडू देखील उपस्थित होते.

या क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयपीएलच्या अकाउंटवरून देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच धोनीची देखील भरभरून स्तुती केली जात आहे.

दरम्यान या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट राखून विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्सचा हा चौथा विजय ठरला. तर सनरायझर्स हैदराबादला चौथ्या पराभवाच्या नामुष्काचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजाची (३/२२) प्रभावी गोलंदाजी आणि डेव्होन कॉनवेच्या (नाबाद ७७ धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने विजय साकारला.

हैदराबादकडून मिळालेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईने तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. डेव्होन कॉनवे व ॠतुराज गायकवाड या सलामी जोडीने ८७ धावांची भागीदारी केली. ॠतुराज ३५ धावांवर धावचीत झाला. पण कॉनवे (नाबाद ७७ धावा) व मोईिन अली (नाबाद ६ धावा) या जोडीने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कॉनवेने आपली खेळी १२ चौकार व १ षटकाराने सजवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates: भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT