MS Dhoni Leg Injury IPL 2024 sakal
IPL

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

MS Dhoni Leg Injury : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.

Kiran Mahanavar

MS Dhoni Leg Injury : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो शेवटच्या काही ओव्हरमध्ये वेगाने धावा काढत आहे. आणि आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात चांगले योगदान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या उत्कृष्ट लयीत असूनही तो अत्यंत कमी फलंदाजी करत आहे, त्यामुळे कॅप्टन कूलवरही टीका होत आहे. धोनीच्या बचावात अनेक तज्ञ याला रणनीतीचा एक भाग म्हणत आहेत. पण आता त्यामागचे कारण समोर आले आहे.

खरंतर, चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधाराला पायाच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. आणि त्यामुळेच तो फलंदाजीसाठी खाली येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वरच्या क्रमाने न येणे त्याच्यासाठी मजबुरी आहे असे सूत्रांनी सांगितले की, धोनीच्या पायाला दुखापत झाली तरी तो आयपीएल 2024 खेळत आहे.

रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनीला आयपीएल 2024 च्या सुरुवातीला पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. चेन्नईचा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज डेव्हॉन कॉनवे उपलब्ध असता तर धोनीने विश्रांती घेण्याचा विचार केला असता. पण कॉनवेच्या अनुपस्थितीत धोनीकडे फारसे पर्याय नव्हते.

धोनी आयपीएल 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीने खेळला होता, ज्यावर चेन्नईने हंगाम जिंकल्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करावी लागली. अहवालात असे सूचित होते की गुडघा बरा झाला आहे. परंतु स्नायूंच्या ताणामुळे मैदानावरील त्याच्या हालचाली मर्यादित आहेत. सराव सत्रादरम्यान धोनी अजिबात धावत नाही आणि त्याची संपूर्ण तयारी मोठे षटकार मारण्याची असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT