MS Dhoni is the God of Chennai sakal
IPL

MS Dhoni : 'धोनी हा चेन्नईचा देव, लवकरच त्याच्या नावावर मंदिरे बांधली...' CSKच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

Ambati Rayudu On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्सने रविवारी त्यांच्या घरच्या चेपॉक स्टेडियमवर या हंगामातील शेवटचा सामना खेळला आणि तो जिंकला पण. सामना संपल्यानंतर धोनीने स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचे आभार मानले.

Kiran Mahanavar

Ambati Rayudu On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्सने रविवारी त्यांच्या घरच्या चेपॉक स्टेडियमवर या हंगामातील शेवटचा सामना खेळला आणि तो जिंकला पण. सामना संपल्यानंतर धोनीने स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचे आभार मानले. चेन्नईचे चाहते धोनीची पूजा करतात यात शंका नाही. दरम्यान, माजी CSK खेळाडू अंबाती रायडूने माहीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लवकरच धोनीचे मंदिर चेन्नईत बांधले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमएस धोनीच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. माही मैदानावर आल्यावर स्टेडियमचे वातावरण पाहण्यासारखे असते. माहीची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. रविवारी चेन्नईच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूच्या एका वक्तव्याची बरीच चर्चा झाली आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, "धोनी चेन्नईचा देव आहे आणि मला खात्री आहे की, आगामी काळात धोनीचे मंदिर चेन्नईत बांधले जातील. तो असा व्यक्ती आहे ज्याने भारताला 2 वर्ल्ड कपचा आनंद दिला आणि अनेक गौरव मिळवून दिले. चेन्नईला त्याने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे.

एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये सर्व सामने खेळत आहे. यष्टिरक्षक म्हणून आपली भूमिका बजावण्यासोबतच तो खालच्या क्रमाने फलंदाजीला येतो आणि षटकार आणि चौकार मारून चाहत्यांना रोमांचित करतो. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

माहीला गुडघ्यामध्ये समस्या आहे, त्यामुळे ती लंगडतही आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ऋतुराज गायकवाड यांच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. अशा स्थितीत एमएसचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. पण, त्याच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा; शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली TET परीक्षेविरूद्ध दाखल करणार पुनर्विचार याचिका

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

SCROLL FOR NEXT