MS Dhoni catch CSK vs GT IPL 2024 sakal
IPL

CSK vs GT MS Dhoni : फ्लाइंग धोनी... माहीचा खतरनाक कॅच पाहिला का? वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अप्रतिम झेल... Video Viral

IPL 2024 CSK vs GT MS Dhoni brilliant catch : इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या सामन्यात दोन चॅम्पियन संघ आमनेसामने आले.

Kiran Mahanavar

MS Dhoni catch CSK vs GT IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या सामन्यात दोन चॅम्पियन संघ आमनेसामने आले. चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई सुपर किंग्जने आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारून गुजरात टायटन्सला मोठे लक्ष्य दिले. पण गुजरात टायटन्स संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीची जादू पाहायला मिळाली.

42 वर्षीय धोनीने आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उडी मारत विजय शंकरचा अप्रतिम झेल घेतला. आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

42 वर्षीय एमएस धोनी विकेटच्या मागून सामन्याचा दिशा बदलण्यात माहिर आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने 252 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 141 झेल घेतले आहेत, तर 42 खेळाडूंना स्टंपिंग केले आहे.

यासोबत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 36 स्टंपिंग करताना 133 झेल घेतले आहेत. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्सचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 163 सामन्यात 84 झेल आणि 26 स्टंपिंग केले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुजरातविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीला आला. आणि पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. शिवम दुबेने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 221.73 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

शिवमने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याचवेळी संघाचा कर्णधार गायकवाड आणि रचिन रवींद्र अर्धशतकापासून अवघ्या 4-4 धावा दूर राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT