MS Dhoni to be banned for IPL 2023 Final CSK skipper intentionally waste time in Qualifier 1 with umpires 
IPL

GT vs CSK MS Dhoni : सामना जिंकला पण धोनीच्या हातून मोठी चूक? कारवाई होण्याची शक्यता

अंपायर्सच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

धनश्री ओतारी

आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. चेन्नईने हा सामना 15 धावांनी जिंकला पण चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या हातून मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (MS Dhoni to be banned for IPL 2023 Final CSK skipper intentionally waste time in Qualifier 1 with umpires)

मॅच दरम्यान धोनीकडून एक चूक झाल्याची चर्चा सध्या क्रिकेट जगतात सुरु आहे. क्वालिफायर 1 च्या सामन्यात धोनीने जाणूनबुजून वेळ वाया घालवल्याच आरोप त्याच्यावर होत आहे. यापूर्वी, ओव्हर्सची गती धीमी राखून अचारसंहितेच उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली होती.

नेमकं काय घडलं?

गुजरातची टीम बॅटिंग करताना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये धोनीने मैदानावरील अंपायर्ससोबत वाद घातला. त्यामुळे सामन्याला चार मिनिटं उशिर झाला.

गुजरातची बॅटिंग सुरु असताना, 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. माथीशा पाथीराणााला दुसरी ओव्हर टाकण्यापासून मनाई करण्यात आली. श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजाने नऊ मिनिटांचा ब्रेक घेतला होता.

तो मैदानाच्या बाहेर गेला होता. जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला, तेव्हा अंपायर्सनी त्याला रोखलं व धोनीसोबत चर्चा केली. पाथिराणाने ब्रेकनंतरचा मैदानावरील वेळ पूर्ण केलेला नाही, असं अंपायर्स म्हणणं आहे.

धोनीने पाच मिनिट अंपायर्ससोबत वाद घातला. अंपायर्ससोबत 5 मिनिट वाद घातला. हे अनावश्यक आहे. यामुळे खेळ थांबलाय. त्याऐवजी दुसऱ्या बॉलरला गोलंदाजी द्या. मॅच संपल्यानंतर धोनीने या बद्दल खेद व्यक्त करावा” असं सायमन डुल ऑनएअर यांनी मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT