MS Dhoni MI vs CSK IPL 2024  esakal
IPL

MS Dhoni MI vs CSK : फक्त 4 धावा... सीएसकेचा थला धोनी वानखेडेवर करणार मोठा कारनामा

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी आज वानखेडेवर आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळणार आहे. धोनी हा शेवटचा वानखेडेवर खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर त्याचा हा शेवटचा हंगाम असेल तर वानखेडेवरचा हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना असेल.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी एक मोठा कारनामा करण्याची देखील शक्यता आहे. मुंबई अन् चेन्नईचा सामना हा आयपीएलमधील एल क्लासिको सामना म्हणून ओळखला जातो. हा सामना धोनी खास करण्याची शक्यता आहे. तो चेन्नईकडून 5000 धावा करण्यापासून फक्त 4 धावा दूर आहे. जर धोनीला आजच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली अन् त्यानं 4 धावा केल्या तर तो सीएसकेकडून 5000 धावा करणारा सुरेश रैना नंतरचा दुसरा फलंदाज ठरणार आहे.

चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • सुरेश रैना - 200 सामने, 5529 धावा

  • महेंद्रसिंह धोनी - 249 सामने, 4996 धावा

  • फाफ ड्युप्लेसिस - 100 सामने, 2932 धावा

  • मायकल हसी - 64 सामने, 2213 धावा

  • मुरली विजय - 89 सामने, 2205 धावा

चेन्नईची संभाव्य प्लेईंग 11 :

ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिचेल, समीर रझवी, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, मस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे, महीश तिक्षाणा (इम्पॅक्ट प्लेअर - शिवम दुबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT