IPL 2023 Rohit Sharma  
IPL

IPL 2023 : 5 धावांनी सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित संतापला! पराभवासाठी या 3 खेळाडूंना धरले जबाबदार

सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

IPL 2023 Rohit Sharma : लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह लखनऊ संघाने प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचवेळी सामना हरल्याने मुंबईसाठी प्लेऑफचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली, मात्र त्यानंतर मुंबईची मधली फळी पूर्णपणे ढेपाळली. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर म्हणाला की, आम्ही चांगले खेळलो नाही. असे काही क्षण होते ज्यांचे भांडवल करायला हवे होते पण तसे होऊ शकले नाही. हे दुर्दैवी होते पण आम्हाला मनोबल उंचावले पाहिजे.

ईशान किशनसोबत पहिल्या विकेटच्या भागीदारीत 58 चेंडूत 90 धावा करणाऱ्या रोहित म्हणाला की, आम्ही खेळपट्टीचे चांगले मूल्यांकन केले होते. ते पूर्वीसारखे नव्हते आणि फलंदाजीसाठी चांगले होते. उत्तरार्धात आम्ही आमची लय गमावली. गोलंदाजीतही त्याने शेवटच्या तीन षटकांत भरपूर धावा दिल्या.

मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकांत 54 धावा दिल्या. मुंबईसाठी ख्रिस जॉर्डनने 18व्या षटकात 24 धावा, जेसन बेहरेनडॉर्फने 19व्या षटकात 15 धावा, आकाश मधवालने 20व्या षटकात 15 धावा दिल्या.

प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यतेबाबत रोहित शर्मा म्हणाला की, आकडेवारी काय सांगते ते मला माहीत नाही. पुढचा सामना आम्हाला कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या आयपीएल 2023 मध्ये 7 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 14 गुण असून त्याचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादकडून होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 177 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकांत 54 धावा दिल्या. लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने 89 धावांची शानदार खेळी केली. त्याच्यामुळेच लखनऊचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. रोहित शर्मा (37) आणि इशान किशन (59) यांनी मुंबई संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र त्यानंतर मुंबईने पाच धावांनी सामना गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT