Mumbai Indians Captain Rohit Sharma Dismissal controversy  
IPL

IPL News : रोहित शर्मा Out की Not Out; अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद

संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो अन्...

धनश्री ओतारी

मुंबई इंडियन्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलमधील १ हजारावा सामना मोठ्या दिमाखात जिंकला. मात्र, कर्णधार रोहित शर्माच्या विकेटवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Mumbai Indians Captain Rohit Sharma Dismissal controversy )

संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बॅटिंग करताना दिसतोय, तर दुसरीकडे विकेटमागे संजू उभा आहेत. संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट देण्यात आलं. त्यावरुन सोशल मीडियावर फॅन्स नाराज झाले आहेत.

चाहत्यांनी ट्विटरवर रोहितच्या बाद झाल्याची विकेट पोस्ट करत दावा केला की, चेंडू बेल्सला लागला नाही, पण विकेटकीपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमुळे बेल्स जमीनीवर पडल्या. त्यामुळं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बाद करण्याचा निर्णय देताना अंपायरकडून मोठी चूक झाल्याचं उघडकीस आलंय.

आयपीएल 2023 मध्ये 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघात संपन्न पडला. रोहित शर्माचा हा 150 वा आयपीएल सामना होता. मात्र, नेहमीप्रमाणे वाढदिवसादिवशी रोहितचा फ्लॉप शो दिसून आला. राजस्थानविरुद्ध रोहितला 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा करता आल्या आहेत. संदीप शर्माच्या या परफेक्ट बॉलवर रोहित शर्मा क्लिन बोल्ड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT