mumbai indians-captain-rohit sharma 
IPL

IPL 2023: रोहित शर्माने सामना संपल्यानंतर पत्नी रितिकाला केला व्हिडीओ कॉल अन्...

पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा झाला रोमँटिक

Kiran Mahanavar

Mumbai Indians Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत होता. पण मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात हिटमॅनची बॅट खूप बोलली. दिल्लीविरुद्ध रोहित फॉर्ममध्ये दिसला. त्याने चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पाडला. यासह रोहितने 24 डावांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकले.

एवढेच नाही तर रोहितने 65 धावांची अप्रतिम खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. हिटमॅनने केवळ फलंदाजीच केली नाही तर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मध्ये दिल्लीविरुद्ध पहिला विजयही नोंदवला.

मुंबईने कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव केला. हा सामना कर्णधार रोहितसाठी अप्रतिम होता. सामन्यानंतर रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसला, ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने स्वतः त्यांच्या अधिकृत खात्यावर शेअर केला आहे.

कॉल दरम्यान हिटमॅन खूप आनंदी दिसत होता. त्याने आपला खास दिवस आपल्या पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर साजरा केला, ज्याचा व्हिडिओ आता चर्चेत आहे. याशिवाय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर प्रथम फलंदाजी करताना 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे मुंबईने शेवटच्या चेंडूवर 6 विकेट्स राखून पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT