Rohit Sharma Hardik Pandya IPL 2024  esakal
IPL

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Hardik Pandya IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर गेला आहे. नेतृत्वबदलानंतर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही ठीक नाही असे वृत्त समोर आले होते. त्यातच रोहित शर्मा हा पुढच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्स रोहित शर्मासोबत हार्दिक पांड्याला देखील रिलीज करण्याची शक्यता बोलून दाखवली. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबईच्या दोन बड्या खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं. त्यामुळे पुढच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याशिवाय दिसू शकते.

हार्दिक पांड्यासाठी यंदाचा हंगाम फार काही चांगला गेलेला नाही. त्याला आतापर्यंत फक्त 200 धावा आणि 11 विकेट्स घेण्यात यश आलं आहे. रोहित शर्माने हंगामाची सुरूवात चांगली केली होती. त्याने शतक देखील ठोकलं होतं. मात्र त्यानंतर त्याची कामगिरी खालावली. टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर या दोघांची खालावलेली कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे.

आता मुंबई इंडियन्स पुढच्या हंगामासाठी फक्त दोन खेळाडूंनाच रिटेन करण्याचा विचार करत असेल असं सेहवागचं मत आहे. सेहवागच्या मते हे दोन खेळाडू सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह असतील.

क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला की, 'मला सांगा शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खानला एकाच चित्रपटात घेतल्यावर तो चित्रपट हिट होईल अशी शाश्वती देता येते का? तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तुम्हाला चांगली स्किप्ट हवी.

तसंच क्रिकेटमधील मोठी नावं एकत्र आणली तरी त्यांना मैदानावर कामगिरी करून दाखवावी लागेल. रोहित शर्माने एक शतकी खेळी केली अन् मुंबईचा पराभव झाला. बाकीच्यांच्या कामगिरीचं काय?'

सेहवाग पुढे म्हणला की, 'इशान किशन संपूर्ण हंगाम खेळला आहे. मात्र त्याला पॉवर प्लेच्या पुढे फलंदाजीच करता आलेली नाही. मुंबईच्या संघात सध्या दोनच नावे निश्चित आहेत. जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव. खेळाडू रिटेन करण्यामध्ये या दोघांचेच नाव आघाडीवर असणार आहे. त्यानंतर ते तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायाचा विचार करतील.'

सेहवागच्या मताशी सहमती दर्शवत मनोज तिवारी म्हणाला की, मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन पुढच्या हंगामात सूर्यकुमार किंवा बुमराहला कॅप्टन करू शकते. बुमराहने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने इंग्लंड आणि आयर्लंडविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत देखील संघाची धुरा खांद्यावर वाहिली होती.

दुसरीकडे सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. बुमराहने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 20 विकेट्स घेतल्या आहेत. तो ऑरेंज कॅप होल्डर आहे. तर सूर्यकुमार यादवने 345 धावा केल्या आहेत. यात एका शतकी खेळीचा देखील समावेश आहे. तिवारीला देखील खात्री आहे की रोहित पुढच्या हंगामात मुंबईचा भाग असणार नाहीये.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT