Rohit Sharma | CSK vs MI | IPL 2024 Sakal
IPL

MI vs CSK: पराभवाचं दु:ख! शतकानंतरही मुंबई इंडियन्स हरल्यानंतर रोहितने एकट्यानेच धरली ड्रेसिंग रुमची वाट, Video Viral

Rohit Sharma Viral Video: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शतक केल्यानंतरही मुंबई इंडियन्स पराभूत झाल्याने रोहित अत्यंत निराश झाल्याचे दिसले.

Pranali Kodre

Rohit Sharma Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रविवारी (14 एप्रिल) 29 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 धावांनी विजय मिळवला.

चेन्नईच्या या विजयानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित अत्यंत निराश होऊन ड्रेसिंग रुममध्ये गेलेला दिसत आहे.

चेन्नईने या सामन्यात मुंबईसमोर २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहितने शतकी खेळी केली. परंतु, त्याला अन्य कोणाची दमदार साथ मिळाली नाही.

सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहितने 63 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. परंतु, मुंबई संघ २० षटकात ६ बाद १८६ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

दरम्यान, या सामन्यानंतर खेळाडूंची हात मिळवल्यानंतल रोहित एकटाच डोके खाली घालून पॅव्हेलियनममध्ये परतल्याचे दिसले. त्याच्या ऐकूणच देहबोलीवरून तो अत्यंत निराश असल्याचे दिसले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात चेन्नईने दिलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहितव्यतिरिक्त तिलक वर्मा (31) आणि इशान किशन (23) यांनाच १५ धावांचा टप्पा ओलांडता आला. या दोघांनीही रोहितसह अर्धशतकी भागीदारी केली.

परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर मात्र, रोहितला कोणाची फारशी साथ मिळाली नाही. रोहित आणि इशान यांच्यात ७० धावांची सलामी भागीदारी झाली होती. तसेच रोहित आणि तिलक यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी झाली होती.

चेन्नईकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने ४ विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूत ६९ धावांची खेळी केली, तर शिवम दुबेने ३८ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबरच्या अखेरच्या चार चेंडूत एमएस धोनीने ३ षटकारांसह २० धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद २०६ धावा केल्या होत्या.

मुंबईकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने २ विकेट्स घेतल्या, तर जेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT