Mumbai Indians Got Relief After Suryakumar Yadav join MI  esakal
IPL

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा; दुसऱ्या सामन्यापूर्वी रोहित टेन्शन फ्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती. आता त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होत आहे. पहिला पराभव बाजूला सारून संघ आपला पहिला विजय साजरा करण्यासाठी आतूर झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीचा कणा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतीतून सावरला आहे.

सूर्यालाच्या बोटाला वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत होता. या दुखापतीमुळेच त्याला आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'सूर्यकुमार यादव हा विलगीकरणातून बाहेर आला आहे आणि त्याने बुधवारी मुंबई इंडियन्सचा संघ जॉईन केला आहे. त्याने कायरन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराहबरोबर जीम सेशन देखील केला.

मुंबई इंडियन्स आपल्या अधिकृत वक्तव्यात पुढे म्हणते की, 'संघाने काल स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग सेशन केले. या सेशनमध्ये वेट ट्रेनिंग आणि फिटनेस ट्रेनिंगवर भर देण्यात आला होता.' मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला सामना हरला होता. त्यांचा दिल्लीने चार विकेट्सनी पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT