Mumbai Indians Sakal
IPL

IPL 2022 : ...तर MI यंदाही Playoffs मध्ये खेळेल? हा घ्या पुरावा

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील नव्या संघ बांधणीसह मैदानात उतरलेला मुंबई इंडियन्सचा संघ बिकट परिस्थितीत दिसतोय. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्यांना सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा त्यांच्यावर एका हंगामात सलग पाच पराभव स्विकारण्याची नामुष्की ओढावली. या पराभवासह नकोसा विक्रम त्यांच्या नावे झाला. 2014 मध्ये मुंबई इंडियन्सला सलग पाच पराभवाचा सामना करावा लागला होता.

2019 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 2013 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2012 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाल हंगामात सलग पाच पराभव स्विकारण्याची वेळ आली होती. पण मुंबई इंडियन्सची गणित या तीन संघापेक्षा वेगळी आहेत. आयपीएलमध्ये पहिल्या पाच सामन्यात पराभव स्विकारुन मुंबई इंडियन्स संघाने प्ले ऑफ गाठली होती. त्यामुळे यंदाही ते खराब कामगिरीचा शिक्का सर्वोत्तम विक्रमामध्ये बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

2014 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सनं कशी मारली होती प्ले ऑफमध्ये मजल

2014 मध्ये आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धा ही युएईच्या मैदानात खेळवण्यात आली होती. यावेळी पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धा भारतीय मैदानात सुरु झाली. वानखेडेच्या मैदानावरील सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करत मुंबई इंडियन्सनं हंगामातील विजयायाचं खात उघडलं. उर्वरित सामन्यातील सात साने जिंकत मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला.

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईला काय करावे लागेल?

मुंबई इंडियन्सचा संघ ग्रुप स्टेजमध्ये लखनौ विरुद्ध दोन, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दोन तर राजस्थान रॉयल्स, गुजरात सुपर जाएंट्स, कोलकाता आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाविरुद्ध असे नऊ सामने खेळणार आहेत. उर्वरित प्रत्येक सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. एखादा सामना गवाला तरी चालेल पण किमान 7 ते आठ लढती त्यांनी जिंकल्या तर ते प्ले ऑफच तिकीट मिळवून शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT