rohit sharma-on-jofra archer 
IPL

IPL 2023: कर्णधार रोहितने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना दिली वाईट बातमी! हा खेळाडू IPL मधून बाहेर?

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

सकाळ ऑनलाईन टीम

Mumbai Indians IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी पराभव करून पहिला विजय नोंदवला. त्याचवेळी दिल्लीला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 172 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या चेंडूवर चार गडी गमावून लक्ष्य गाठले.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे. जोफ्रा आर्चरला नुकतीच दुखापत झाली होती. रोहितने सांगितले की तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी नेट सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपरला चेंडू लागला आणि दुखापत झाली.

2019 मध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश इंग्लंडला विश्वचषक जिंकणाऱ्या संघात करण्यात आला होता. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा स्थितीत जोफ्रा आर्चरची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. त्याने आयपीएलमध्ये 36 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या एकूण टी-20 विक्रमावर नजर टाकली तर त्याने 128 डावात 167 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुंबई इंडियन्स अजूनही आयपीएल 2023 मधील पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. मोसमातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्याच वेळी मुंबईने आयपीएल 2022 मेगा लिलावात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला विकत घेतले, परंतु दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT