IPL 2024 Suryakumar Yadav
IPL 2024 Suryakumar Yadav sakal
IPL

Suryakumar Yadav : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल! स्टार खेळाडूची ताफ्यात एंट्री

Kiran Mahanavar

IPL 2024 Suryakumar Yadav : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची अवस्था फारशी खराब राहिली आहे. संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये सलग 3 सामने गमावले आहेत आणि ताज्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये समाविष्ट असलेल्या दहा संघांपैकी मुंबई हा एकमेव संघ आहे, जो आतापर्यंत एकही सामना जिंकू शकला नाही.

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, लवकरच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव संघात सामील होणार आहे आणि पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो देखील सामील होण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादव आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी सज्ज दिसत आहे. क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की, सूर्याला एनसीएने मान्यता दिली आहे, तो आता त्याच्या संघात सामील होऊ शकतो आणि आयपीएलमध्ये खेळू शकतो.

शुक्रवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी तो संघासोबत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चांगली गोष्ट म्हणजे यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच ७ एप्रिलला मुंबईचा संघ आपला पुढचा सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बराच काळ मैदानातून बाहेर आहे. डिसेंबर 2023 मध्ये तो शेवटचा क्रिकेट खेळला होता, जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 मध्ये शतक झळकावले होते.

या मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर, सूर्यकुमारने स्पोर्ट्स हर्नियाचे ऑपरेशन देखील केले, ज्यामुळे त्याचे क्रिकेटमध्ये पुनरागमन लांबले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT