IPL

MI vs CSK IPL 2023 : मुंबईचा सलग दुसरा पराभव; चेन्नईने 7 विकेट्स राखून केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

MI vs CSK IPL 2023 Live : आयपीएल 2023 मधील मुंबई - चेन्नई पहिली एल क्लासिको चेन्नईने 7 विकेट्स राखून जिंकली. चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत मुंबईला त्यांच्यात मैदानात 157 धावात रोखले. त्यानंतर हे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांची गुणांची पाटी अजून कोरीच आहे.

चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 40 धावांची संयमी खेळी करत चेन्नईचा विजय तडीस नेला. त्याला शिवम दुबेने 28 धावांचे तर रायुडूने 20 धावा करून त्याला चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, मुंबईचे महान फलंदाज एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनच्या वाटेवर जात असताना तिलक वर्मा (22), टीम डेव्हिड (31) आणि ऋतिक शौकीन (18) यांनी संघाची लाज वाचवली. मुंबईची अवस्था 7 बाद 113 धावा अशी झाली होती. तरी मुंबईने 20 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने 3 तर मिचेल सँटरन आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ऋतुराजची सेन्सेबल खेळी, चेन्नई विजयाच्या उंबरठ्यावर

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने कोणतीही घाई गडबड न करता चेन्नईचा विजय तडीस नेला.

82-2 : अजिंक्यचे धडाकेबाज अर्धशतक 

शुन्यावर पहिली विकेट गमावल्यानंतर हा सामना टाईट होणार असे वाटत होते. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने बघता बघता मुंबईचीच हवा टाईट केली. 

अजिंक्यने 19 षटकात अर्धशतकी मजल मारली होती. त्याने ऋतुराज गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. यात अजिंक्य रहाणे 27 चेंडूत 61 धावांचा वाटा होता. मात्र ही तुफानी खेळी पियुष चावलाने संपवली.

0-1 : बेहरेनडॉर्फने सीएसकेला दिला शून्यावर पहिला धक्का

मुंबई इंडियन्सचे 158 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला बेहरेनडॉर्फने पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने डेवॉन कॉन्वेला शुन्यावर बाद केले.

102-6 : रविंद्र जडेजाने केली तिसरी शिकार 

गेल्या सामन्यात 82 धावांची खेळी करत मुंबईची लाज वाचवलेल्या तिलक वर्माने 18 चेंडूत 22 धावा करत सेट होण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने त्याला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला.

जडेजा - सँटनर जोडीने मुंबईला केले हैराण

रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटनरच्या फिरकीपुढे मुंबईचे रथी महारथी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. या जोडीने मुंबईची अवस्था 5 बाद 76 धावा अशी केली.

64-2 : पॉवर प्ले संपता संपता मुंबईला दोन धक्के

पॉवर प्लेमध्ये रोहितच्या धक्क्यातून सावरत असतानाच मुंबईला रविंद्र जडेजाने अजून एक धक्का दिला. त्याने 21 चेंडूत 32 धावा करणाऱ्या इशान किशनला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला 1 धावेवर बाद करत अजून एक मोठा धक्का दिला.

38-1 : रोहित - इशानची आक्रमक सुरूवात 

चेन्नईने प्रथम फलंदाजीला पाचारण केलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये तरी चांगली सुरूवात केली. होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 4 षटकात 38 धावा केल्या. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुषार देशपांडेने रोहित शर्माची 21 धावांवर दांडी उडवत मुंबईला पहिला धक्का दिला.

चेन्नईने नाणेफेक जिंकली

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT