Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore  esakal
IPL

MI vs RCB : सूर्या चमकला; मुंबईने आरसीबीचा केला 6 विकेट्स अन् 21 चेंडूत राखून पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकापासूनच आपली धावांची सरासरी 10 धावा प्रति षटकाच्या आसपास ठेवली होती. त्यामुळे मुंबईने आरसीबीने 200 धावांचे आव्हान 17 व्या षटकातच पार केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. त्याने 237.14 च्या स्ट्राईक रेटने धावा करत मुंबईला महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्याला नेहल वधेराने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान उभे केले. मुंबईच्या बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यासमोरही ग्रेन मॅक्सवेल (66) आणि फाफ ड्युप्लेसिस (65) यांनी झंजावाती 120 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहचवले. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फने चांगला मारा करत 36 धावात 3 बळी टिपले.

मुंबईने केले कमबॅक 

मॅक्सवेल बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर 1 तर फाफ ड्युप्लेसिस देखील 41 चेंडूत 65 धावांची खेळी करून बाद झाला. यामुळे आरसीबीचे अवस्था 2 बाद 136 धावांवरून 5 बाद 146 धावा अशी झाली. मुंबईने 13 व्या षटकानंतर सामन्यात जोरदार पुनरागमन केले. आता शेवटच्या 5 षटकात दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांच्यावर आरसीबीला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी होती.

बेहरनडॉर्फने दिला दिलासा

आरसीबीची मॅक्सवेल आणि ड्युप्लेसिस जोडी कधी शतकी भागीदारीपर्यत पोहचली हे कळालेच नाही. 120 धावांची भागीदारी रचत संघाला 13 व्या षटकातच 136 धावांपर्यंत पोहचवले होते. अखेर बेहरनडॉर्फने 33 चेंडूत 68 धावा करणाऱ्या मॅक्सवेलला बाद केले अन् ही जोडी फोडली.

खराब सुरूवातीनंतर मॅक्सवेल ड्युप्लेसिसने सावरले

आरसीबीच्या 16 धावा झाल्या असताना विराट कोहली आणि अर्जुन रावत दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सारवला. ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी करत 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर फाफ ड्युप्लेसिसने देखील आपला गिअर बदलला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत आरसीबीला 10 व्या षटकात 104 धावांपर्यंत पोहचवले.

16-2 : बेहरनडॉर्फने दिले दोन मोठे धक्के

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पॉवर प्लेमध्ये आरसीबीची सुरूवात खराब झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फने पहिल्याच षटकात विराट कोहलीला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्जुन रावतला 6 धावांवर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

आर्चर बाहेर जॉर्डन आत

मुंबई इंडियन्सने आपल्या संघात एक बदल केला असून जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डलना संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबईने नाणेफेक जिंकली. 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज कोण जाणार तिसऱ्या स्थानावर

मुंबई आणि बेंगलोर सामन्यातील विजेता आयपीएलच्या गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT