MI vs RCB Toss Controversy Video
MI vs RCB Toss Controversy Video esakal
IPL

MI vs RCB Toss Controversy : मुंबई - आरसीबीच्या सामन्यात टॉसवेळी झाली चिटिंग... सोशल मीडियावरील Video चं काय आहे सत्य?

अनिरुद्ध संकपाळ

MI vs RCB Toss Controversy Video : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने 197 धावांचे लक्ष्य 7 गडी राखून पूर्ण केले. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील मुंबईचा हा सर्वात मोठा विजय होता, पण या सामन्याबाबतही वाद निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर काही चाहते दावा करत आहेत की मॅच रेफरीने नाणेफेक दरम्यान चिटिंग केलं आहे. याशी संबंधित काही व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास केला असता आणखी काही गोष्टी समोर आल्या.

मुंबई आणि आरसीबी यांच्यातील हा सामना 11 एप्रिल रोजी झाला होता. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान, जेव्हा सामनाधिकारी जवागल श्रीनाथ नाणं उचलत होता तेव्हा त्यानं नाणेफेकीचा कौल बदलल्याचा आरोप करण्यात आला. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी सांगितले की, श्रीनाथने नाणे उचलताना नाणं फिरवलं होतं.

सोशल मीडियावर दोन प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नाण्याच्या बाजू फिरवण्याचा दावा केला जात आहे. श्रीनाथने थेट नाणे हातात घेतले आणि त्याच्या स्थितीत कोणतीही छेडछाड केली नाही हे दाखवणारा दुसरा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

या व्हिडिओसोबत युजरने लिहिले की, 'सर्व स्पष्ट करणारा टॉसचा व्हिडीओ... तुम्हाला अजूनही शंका असेल तर एकतर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा किंवा मानसिक रुग्णालयात जा. वास्तविक, या सामन्याच्या नाणेफेकीबाबत असे घडले की, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेकीसाठी दिलेला कॉल श्रीनाथ विसरला होता. यावरून हा सगळा गोंधळ सुरू झाला.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT