IPL

IPL 2023 : विराट कोहली आऊट झाल्यानंतर नवीनने केले हे कृत्य, RCBच्या चाहत्यांनी केला राडा

विराटच्या विकेटनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हकची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

Kiran Mahanavar

IPL 2023 Virat Kohli : आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा सहावा विजय आहे. या महत्त्वाच्या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी बंगळुरूचा संघ पराभवासह सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्याच षटकात विराट कोहलीला जेसन बेहरेनडॉर्फने आऊट करून पॅव्हेलियनमध्ये परतले. विराटच्या विकेटनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हकची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. तोच नवीन ज्याची नुकतीच एका सामन्यादरम्यान विराटशी भांडण झाली होती.

नवीन-उल-हक ही आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणारा सामना पाहत आहे. पण विराट पहिल्याच षटकात आऊट होताच नवीनने इन्स्टावर एक स्टोरी पोस्ट केली. या फोटोमध्ये टीव्हीवर आरसीबी आणि मुंबईची मॅच सुरू असताना तो आंबे खात असल्याचे दिसत आहे.

नवीन विराटला टार्गेट करण्यासाठी असे करत असल्याचे सोशल मीडियावरील यूजर्सचे मत आहे. नुकत्याच झालेल्या लखनऊ आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान विराटने इंस्टा वर काही स्टोरी पोस्ट केल्या होत्या.

आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन आणि विराटमध्ये वाद झाला होता. लखनौची फलंदाजी सुरू होती आणि मोहम्मद सिराज डावातील 17 वे षटक टाकत होता. या षटकात सिराज आणि नवीन यांच्यात काही वाद झाला. तिथून चर्चा वाढली, मग विराट कोहलीनेही या प्रकरणात उडी घेतली.

विराट आणि नवीन यांच्यातील हा वाद सामना संपल्यानंतर हस्तांदोलन होईपर्यंत टिकला. सर्व खेळाडू हस्तांदोलन करत असतानाही जेव्हा विराट आणि नवीन समोरासमोर आले तेव्हा दोघांमध्ये काही संवाद झाला. यानंतर नवीनने विराटचा हात झटकला आणि तेथून प्रकरण वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT