Virat Kohli | IPL 2024 Sakal
IPL

Virat Kohli: 'सर्वात हळू IPL शतकासाठी...', पाकिस्तानी खेळाडूने विराटला खिजवलं, मात्र स्वतःच झाला ट्रोल

Virat Kohli Century: राजस्थान रॉयल्सविरुद्ध विराटने शतकी खेळी केली, परंतु त्यानंतरही त्याला पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने चिमटा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोच ट्रोल झाला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Century: शनिवारी (6 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 19 वा सामना झाला. जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात बेंगळुरूकडून विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. त्याने 72 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत विराटने 12 चौकार आणि 4 षटकार मारले.

दरम्यान, हे विराटने 67 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो सर्वात धीम्यागतीने आयपीएल शतक करणारा खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत मनिष पांडेची बरोबरी केली आहे. पांडेने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध बेंगळुरूकडूनच खेळताना 67 चेंडूत शतक केले होते.

या लाजीरवाण्या विक्रमामुळे विराट मात्र ट्रोल होत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खाननेही याबद्दल पोस्ट करत डिवचले आहे. जुनैदने ट्वीट केले की 'विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वात धीम्यागतीने शतक केल्याबद्दल अभिनंदन.'

जुनैदच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स सध्या येत आहेत. काही युजर्सने त्यालाच याबद्दल फटकारलेही आहे. याशिवाय काहींनी याकडेही लक्ष वेधले की जुनैदन त्याच्या पोस्टमध्ये कोहलीचे स्पेलिंगही चुकीचे लिहिले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराटच्या स्ट्राईकरेटवर भारताचा माजी सालमीवीर विरेंद्र सेहवागनेही टीका केली. मात्र, याबरोबरच त्याने हे देखील मान्य केले की या संपूर्ण खेळीदरम्यान विराट दबावाखाली खेळला, कारण त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही.

त्याला केवळ सुरुवातीला फाफ डू प्लेसिसने बऱ्यापैकी साथ दिली. मात्र नंतर कोणाचीही फार काळ साथ विराटला मिळाली नाही. डू प्लेसिसने 33 चेंडूत 44 धावा केल्या. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 183 धावा केल्या.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सनेही बेंगळुरूच्या धावसंख्येबद्दल चिमटा काढला. त्यांनी पोस्ट केली की 'जिथे 200 पेक्षा अधिक धावा शक्य होत्या, तिथे 184 धावांचे लक्ष्य सोपे वाटत आहे.'

दरम्यान, राजस्थानच्या फलंदाजांनी या पोस्ट प्रमाणे फलंदाजीही केली. राजस्थानने यशस्वी जैस्वालची विकेट दुसऱ्याच चेंडूवर गमावली होती. परंतु, नंतर जॉस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

सॅमसन 42 चेंडूत 69 धावा करून बाद झाला, तर बटलरने शतकी खेळी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बटलरने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT