Pat Cummins | Suryakumar Yadav | Hardik Pandya Esakal
IPL

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Pat Cummins Broken Finger: पॅट कमिन्सच्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटलेला आहे, याबद्दलची कहाणी त्याने हार्दिक आणि सूर्यकुमारला सांगितल्यानंतर तेही चकीत झाले होते.

Pranali Kodre

Pat Cummins Broken Finger: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या कारकि‍र्दीत मोठे यश मिळवले आहे. त्याच्या गोलंदाजीपुढे अनेक फलंदाजांचीही भंबेरी उडते. पण अनेकांना माहित नाही की कमिन्सच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटला आहे.

याबद्दल त्याने यापूर्वी माहिती दिली होती. दरम्यान, हीच घटना त्याने हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवलाही सांगितली, तेव्हा ते चकीत झाले होते.

सोमवारी (6 मे) आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ७ विकेट्सने विजय मिळवलेला.

दरम्यान, या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार कमिन्स आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक आणि फलंदाज सूर्यकुमार यादव चर्चा करत होते. यावेळीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या चर्चेदरम्यान, कमिन्स त्याच्या तुटलेल्या बोटाची कहाणी हार्दिक आणि सूर्यकुमारला सांगताना दिसत आहे. ते ऐकून हार्दिकने तोंडावर बोट ठेवत आश्चर्यही व्यक्त केले.

कसं तुटलेलं कमिन्सचं बोट?

कमिन्सने अनेक मुलाखतींमध्ये याबाबत माहिती दिली आहे. तो चार वर्षांच्या असताना लॉलीपॉप सर्व भावंडाना वाटत होता. त्यावेळी बहिणीला लॉलीपॉप दाखवत असताना त्याच्या बहिणीने जोरात बाथरुमचा दरवाजा लावला.

त्यामुळे दारात त्याचं बोच अडकून तुटलं. त्या घटनेमुळे कमिन्सने कायमसाठी त्याच्या बोटाच्या वरचा भाग गमावला. दरम्यान, पुढे जसा मोठा झाला, तशी त्याला त्याची सवय झाली. महत्त्वाचे म्हणजे या तुटलेल्या बोटाचा फायदा त्याला गोलंदाजी करतानाही होतो.

कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादची चांगली कामगिरी

आयपीएल 2024 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला 20 कोटींहून अधिकची किंमत मोजत संघात घेतले आणि त्याच्याकडे नेतृत्वाची धूराही सोपवली.

दरम्यान, गेल्या दोन हंगामात संघर्ष करणाऱ्या हैदराबादने यंदा कमिन्सच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. हैदराबादने 11 सामन्यांमध्ये 6 सामन्यांत विजय आणि 5 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. तसेच हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदारही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT