Pat Cummins SRH lose IPL final to KKR sakal
IPL

KKR vs SRH : 'दुर्दैवाने माझा सहकारी स्टार्क...' लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधाराने केलं मोठं वक्तव्य

KKR vs SRH, IPL Final : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

Kiran Mahanavar

Pat Cummins SRH lose IPL final to KKR : आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह सनरायझर्सचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. संघाच्या या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्स खूपच नाराज दिसला. मात्र, त्याने केकेआर संघाचे खूप कौतुक केले. पॅट कमिन्स म्हणाले की, मिचेल स्टार्कने आपल्या गोलंदाजीने सुरुवातीला इतका दबाव निर्माण केला की त्याचा संघ बाहेर पडू शकला नाही.

आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने सनरायझर्सचा 8 गडी राखून सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकांत केवळ 113 धावा केल्या.

प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य 10.3 षटकांत केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. अशाप्रकारे केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

सामन्यानंतर पॅट कमिन्सने या सामन्यात आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हे सांगितले. तो म्हणाला, केकेआरने चांगली गोलंदाजी केली. आणि त्यात दुर्दैवाने, माझा जुना सहकारी मिचेल स्टार्क फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच आम्ही सामन्यातून पूर्णपणे बाहेर पडलो. गेल्या आठवड्यात त्याने अहमदाबादमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आजही त्याने तशीच गोलंदाजी केली. त्यामुळे केकेआरला संपूर्ण श्रेय दिले पाहिजे. आम्ही 160 धावा केल्या असत्या तर आम्ही स्पर्धेत टिकलो असतो. पण मला वाटत नाही की ती 200 पेक्षा जास्त विकेट होती. आम्ही धावा खूप कमी केल्या. आणखी काही धावा झाल्या असत्या तर कदाचित थोडी संधी मिळाली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT