Jony Bairstow | Punjab Kings Sakal
IPL

IPL 2024: पंजाब किंग्सने रचला इतिहास! कोलकाताविरुद्ध 262 धावांचं लक्ष्य गाठत केले 3 मोठे वर्ल्ड रेकॉर्ड

Punjab Kings Records: पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात तब्बल 262 धावाच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत अनेक विक्रम रचले आहेत.

Pranali Kodre

KKR vs PBKS, IPL 2024 Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 8 विकेट्सने विजय मिळवला. पंजाबचा हा विजय ऐतिहासिक ठरला.

या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 261 धावा केल्या आणि पंजाबसमोर 262 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने 2 विकेट्स गमावत अवघ्या 18.4 षटकातच पूर्ण केला.

या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून 523 धावा निघाल्या. यादरम्यान एकूण 42 षटकार मारण्यात आले. त्यातील 24 षटकार पंजाब किंग्सने ठोकले, तर 18 षटकार कोलकाताने ठोकले. त्यामुळे एकूणच या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले.

धावांचा पाठलाग करताना पंजाबने मिळवलेला हा केवळ आयपीएलमधीलच नाही, तर पुरुषांच्या टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच टी20 क्रिकेटमधील एकाच सामन्यात 42 षटकार मारण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली आहे.

कोलकाता-पंजाब सामन्यादरम्यान झालेले महत्त्वाचे विक्रम

पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ

  • 262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024

  • 259 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023

  • 253 धावा - मिडलसेक्स विरुद्ध सरे, द ओव्हल, 2023

  • 244 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, 2018

पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार

  • 42 षटकार - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता, 2024

  • 38 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद, 2024

  • 38 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बेंगळुरु, 2024

  • 37 षटकार बाल्ख लिजंड्स विरुद्ध काबुल झ्वानन, 2018

  • 37 षटकार - सेटं किट्स अँड नेविस पेट्रिओट्स विरुद्ध जमैका तलावाह, 2019

टी20 मध्ये धावांचा पाठलाग करताना उभारलेल्या सर्वोच्च धावसंख्या

  • 262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024

  • 262 धावा - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2024

  • 259 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, 2023

  • 254 धावा - मिडलसेक्स विरुद्ध सरे, द ओव्हल, 2023 (धावांचे लक्ष्य 253)

  • 253 धावा - क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध मुलतान सुलतान, रावळपिंडी, 2023

आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ

  • 262 धावा - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024

  • 224 धावा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह, 2020

  • 224 धावा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024

  • 219 धावा - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, 2021

आयपीएलमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे संघ

  • 24 षटकार - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, 2024

  • 22 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, बेंगळुरू, 2024

  • 22 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024

  • 21 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, 2013

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT