Jony Bairstow - Shashank Singh | Punjab Kings Sakal
IPL

KKR vs PBKS, IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच काय, पण टी20 मध्येही कोणी केलं नव्हतं ते पंजाब किंग्सने करून दाखवलं

KKR vs PBKS, IPL 2024 Match: पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या आयपीएल सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला.

Pranali Kodre

KKR vs PBKS, IPL 2024 Match: ईडन गार्डन्स ऐतिहासिक वारसा लाभलेलं भारतातलं क्रिकेट स्टेडियम, याच स्टेडियमवर 26 एप्रिल 2024 रोजी आयपीएलच्याच नाही, तर टी20 क्रिकेटमधील ऐतिहासिक सामना झाला. हा सामना होता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात.

साधारणत: क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलमधील युद्ध पाहायला मिळतं. पण या सामन्यात पाहायला मिळालं बॅटिंगचं युद्ध आणि ईडन गार्डन्सच्या मैदानात बाजी मारली ती पंजाब किंग्सने तब्बल 262 धावांचं लक्ष्य पूर्ण करत.

या सामन्यात पंजाबचा प्रभारी कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली होती. पण बॉलर्सला या खेळपट्टीवर सूर सापडेना. कोलकाताकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण या दोन्ही सलामीवीरांनी शतकी भागीदारी करत पंजाबच्या गोलंदाजांचा घाम काढला. अखेर नारायण 70 आणि सॉल्ट 75 धावा करून माघारी परतले.

तरी नंतर आलेल्या वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही धावगती कमी होणार नाही याची काळजी घेत फटकेबाजी केली. परिणामी कोलकाताने यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा अडीचशेचा टप्पा पार केला. 20 ओव्हर पूर्ण झाले, तेव्हा कोलकाताने 6 बाद 261 धावा केल्या होत्या.

त्यामुळे पंजाबसमोर 262 धावांचा भलंमोठं आव्हान होतं. पण पंजाबचे धुरंधरही हार मानणारे नव्हते. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने पहिला घाव घातला. तो या सामन्यातून पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोबरोबर सलामी फलंदाजी करताना कोलकाताच्या गोलंदाजांवर बरसला.

त्याच्या आक्रमक खेळामुळे पंजाबला अपेक्षित सुरुवात मिळाली आणि विजयाचा पायाही रचला गेला. पण दुर्दैवाने प्रभसिमरन धावबाद झाला. तो बाद झाल्यानंतर मात्र, बेअरस्टोने गिअर बदलले. त्याने चौकार षटकारांची बरसात करत अवघ्या 45 चेंडूत शतक केलं. त्याला रिली रौसोची साथ मिळाली.

तो बाद झाल्यानंतर बेअरस्टोच्या साथीला शशांक सिंग आला. आधीच फॉर्ममध्ये असणाऱ्या शशांकनेही आल्याआल्याच कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकिकडू बेअरस्टो आणि दुसरीकडून शशांक हे दोघेही एकावर एक प्रहार करत होते आणि तसतसा विजयही पंजाबच्या जवळ येत होता.

अखेर 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शशांक आणि बेअरस्टो एक धाव घेतली आणि पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. बेअरस्टो 108 धावांवर आणि शशांक 68 धावांवर नाबाद राहिला.

हा विजय फक्त आयपीएलमध्येच नाही, तर टी20 क्रिकेटच्या इतिहासातही धावांचा यशस्वी पाठलाग करताना मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात तब्बल 42 सिक्स मारण्यात आले, हा देखील एक विक्रम ठरला.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने मोठ्या धावा झालेल्या पाहायला मिळत आहे, त्यामुळे यापुढेही हे चित्र कायम दिसणार का, हे पाहाणं मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT