PBKS vs MI Sakal
IPL

PBKS vs MI : अखेर मुंबईनं सामना जिंकला; आशुतोष अन् शशांकची झुंज व्यर्थ

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Defeat Punjab Kings IPL 2024 : आशुतोष शर्मा अन् शशांक सिंहने मुंबईचे टेन्शन वाढवलं होतं.

आयपीएलच्या 33 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबला 20 षटकात सर्वबाद 183 धावांपर्यंतच मजल मारता आली.

पंजाबकडून शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी झुंजार खेळ केला. शशांकने 41 तर आशुतोषने 28 चेंडूत 61 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, गेराल्ड कॉट्झी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या तर आकाश माधवाल, हार्दिक पांड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत 78 धावा ठोकल्या. त्याला रोहित शर्माने 36 तर तिलक वर्माने 34 धावा करून चांगली साथ दिली.

PBKS vs MI Live Cricket Score : अखेर मुंबईनं सामना जिंकला; आशुतोष अन् शशांकची झुंज व्यर्थ

आशुतोष शर्माने 28 चेंडूत 61 धावा ठोकल्या तर शशांक सिंहने 25 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हरप्रीत ब्रारने 21 धावा करत पंजाबला सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबला 183 धावात रोखत सामना 9 धावांनी जिंकला.

आशुतोष शर्माचा दांडपट्टा 

शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा पंजाबसाठी कमाल करण्याचा प्रयत्न केला. निम्मा संघ गारद झाला असतानाही त्यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला 11 व्या षटकात 100 धावा करून दिल्या.

पंजाबला सहावा धक्का 

डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या शशांक सिंह आणि जितेश शर्माची जोडी अखेर आकाश माधवालने फोडली. त्याने जितेश शर्माला 9 धावांवर बाद केलं. यामुळे पंजाबची अवस्था 6 बाद 77 धावा अशी झाली.

पंजाबचा निम्मा संघ 49 धावात गारद, शशांक सिंहची एकाकी झुंज 

जसप्रीत बुमराह जेराल्ड कॉट्झेच्या भेदम माऱ्यासमोर पंजाब किंग्जची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पंजाबची अवस्था 5 बाद 49 धावा अशी झाली असताना शशांक सिंहने एकाकी किल्ला लढवत पंजाबची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला.

PBKS vs MI Live Cricket Score : शेवटच्या षटकात हर्षल पटेलचा भेदक मारा, मुंबईला 200 धावांच्या आत रोखलं

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर आलेला हार्दिक पांड्या 10 धावांची भर घालून परतला. त्यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडने स्लॉग ओवरमध्ये फटकेबाजी केली. मात्र शेवटच्या षटकात हर्षल पटेलने मुंबईचे तीन फलंदाज बाद करून फक्त 7 धावा दिल्या. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 7 बाद 192 धावांपर्यंत मजल मारता आली.

PBKS vs MI Live Cricket Score : सूर्याची खेळी सॅमनं संपवली; मुंबईला तिसरा धक्का

सॅम करनने रोहित शर्मापाठोपाठ सूर्यकुमार यादवला देखील पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र तोपर्यंत सूर्याने 53 चेंडूत 78 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने 16 षटकात 148 धावांपर्यंत मजल मारली होती.

PBKS vs MI Live Cricket Score : शर्मा-सूर्याची जोडी फुटली; सॅम करनची ट्रिक कामाला आली

सॅम करनने चायनामनसारखा लेग स्पिन टाकत रोहित शर्माला 36 धावांवर बाद केलं. त्याने सूर्यकुमार यादव आणि रोहितची 81 धावांची भागीदारी तोडली.

PBKS vs MI Live Cricket Score : शर्मा -सूर्याची तडाखेबाज सुरूवात, पॉवर प्लेमध्ये पैसा वसूल फलंदाजी?

मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. इशान किशन 8 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने 4 षटकात 40 धावा करत मुंबईला चांगली सुरूवात करून दिली.

PBKS vs MI Live Cricket Score : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबने आपल्या संघात काही बदल केले आहेत तर मुंबईने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

PBKS vs MI : हेड टू हेड 

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. त्यात मुंबई इंडियन्स पंजाबवर थोडी वरचढ होताना दिसते. मुंबईने 16 तर पंजाबने 15 सामने जिंकले आहेत.

2020 पासून दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यात मुंबईने 4 तर पंजाबने 3 सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT