R Ashwin Have Scope To Improvement In Bowling Say Rajasthan Royals Cricket Director Kumar Sangakkara
R Ashwin Have Scope To Improvement In Bowling Say Rajasthan Royals Cricket Director Kumar Sangakkara  esakal
IPL

आर. अश्विनला अजून सुधारणा करण्याची गरज : कुमार संगकारा

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच 2022 च्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने राजस्थानचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनबाबत (R Ashwin) एक मोठे वक्तव्य केले.

कुमार संगकारा म्हणाला की, अश्विनने आपल्या गोलंदाजीत अजून सुधारणा करण्याची गरज आहे. त्याला अजून जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी करणे गरजेचे आहे. अश्विन भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्यांच्या यादीत 442 विकेट घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विन आपल्या गोलंदाजीत वैवध्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कधी कधी तो ऑफ स्पिनपेक्षा कॅरम बॉल टाकण्यावर जास्त भर देतो.

अश्विनबाबत संगकारा म्हणाला की, 'क्रिकेटच्या मैदानावर त्याने जी कामगिरी केली आहे त्यामुळे तो एक लेजंड आहे. मात्र असे असले तरी त्याला त्याच्या गोलंदाजीत अजून सुधारणा करता येऊ शकते. त्याला ऑफ स्पिनचा जास्तीजास्त वापर करणे गरजचे आहे.' यंदाच्या हंगामात अश्विनने 17 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहे. फायनलमध्ये देखील त्याने ऑफ स्पिनचा मारा करण्याऐवजी कॅरम बॉलचा जास्त वापर केला. त्याने तीन षटकात 32 धावा दिल्या त्यााल एकही विकेट घेतला आली नाही.

राजस्थानच्या संघाने 20 षटकात 9 बाद 130 धावा केल्या होत्या. संगकाराच्या मते या जास्त धावा नव्हत्या. '130 धावा जास्त नव्हत्या. आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करण्याबाबतही विचार करत होतो. मात्र मैदानावर पोहचलो त्यावेळी खेळपट्टी कोरडी होती. आम्हाला वाटले की नंतर ही खेळपट्टी संथ होत जाईल. त्यावेळी आमच्या गोलंदाजांना टर्न मिळेल. आम्हाला 160 ते 165 धावा करणे गरजेचे होते.'

संगकारा पुढे म्हणाला, 'आम्ही या खेळपट्टीवर एक विकेट गमावून 70 धावा केल्या होत्या. मात्र संजू बाद झाल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी आमच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. नंतर आमच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये काही विकेट घेतल्या मात्र शुभमन गिलला पहिल्याच षटकात मिळालेले जीवनदान महाग पडले.'

जरी राजस्थानने हंगामात चांगली कामगिरी केली असली तरी संघात अनेक क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे असे मत संगकाराने व्यक्त केले. तो म्हणाला, 'आम्हाला बऱ्याच क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीत संजू सॅमसन, जॉस बटलर आणि शिमरॉन हेटमायरने चांगल्या धावा केल्या. रियान पराग आणि देवदत्त पडिक्कलने कधी चांगली तर कधी सुमार कामगिरी केली. त्यांना जास्त योगदान देणे गरजेचे आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT