Ricky Ponting Son vs Rahul Tewatia | IPL 2024
Ricky Ponting Son vs Rahul Tewatia | IPL 2024 X/gujarat_titans
IPL

GT vs DC: ज्युनियर पॉटिंग विरुद्ध तेवतिया! दिल्ली-गुजरात आमने-सामने येण्यापूर्वीच अहमदाबादमध्ये रंगली खास लढत, पाहा Video

प्रणाली कोद्रे

IPL 2024 Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होत आहे. बुधवारी (17 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे.

दरम्यान, या सामन्याआधीचा एक खास व्हिडिओची सध्या चर्चा होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गुजरात टायटन्सचा क्रिकेटपटू राहुल तेवतिया यांचा आहे. हा व्हिडिओ गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की सामन्यापूर्वी दोन्ही संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार सराव करत आहेत. या सरावावेळी पॉटिंगबरोबर त्याचा मुलगा फ्लेचर विलियम देखील उपस्थित होता. फ्लेचर देखील क्रिकेट खेळतो.

या सरावावेळी तेवतियाने पाँटिंगचीही चर्चा केली. यानंतर तो फ्लेचरशीही संवाद साधताना दिसला. तेवतियाने फ्लेचरला विचारले की 'तू फलंदाज आहेस की अष्टपैलू?' यावर फ्लेचर म्हणाला की अष्टपैलू. त्याने असेही सांगितले की तो मध्यमगती गोलंदाजी करतो.

त्यानंतर पॉटिंगने लगेचच चेंडू त्याच्याकडे देत त्याची गोलंदाजी तेवतियाला दाखवण्यास त्याला सांगितले. वडिलांच्या सांगण्यावरून फ्लेचरनेही तेवतियाच्याविरुद्ध गोलंदाजी केली. या व्हिडिओला युजर्सकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

दरम्यान, फ्लेचर यापूर्वी अनेकदा पॉटिंगसह दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात दिसला आहे.

दिल्ली - गुजरात संघात सामना

दिल्ली आणि गुजरात यांची आत्तापर्यंतची कामगिरी संमिश्र झाली आहे. दिल्लीने आत्तापर्यंत 6 पैकी 2 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर आहेत.

तसेच गुजरातने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. गुजरात गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहेत. आता या दोन संघात सामना होत असून दोन्ही संघांना विजयाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT