Shane Bond Rajasthan Royals  esakal
IPL

Shane Bond Rajasthan Royals : MI ला चार ट्रॉफी जिंकून देणारा कोच आता RR च्या गोटात दाखल

अनिरुद्ध संकपाळ

Shane Bond Rajasthan Royals : मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी बॉलिंग कोच शेन बाँडने नुकेतच फ्रेंचायजीला टाटा बाय-बाय केलं. यानंतर राजस्थानचा बॉलिंग कोच लसिथ मलिंगाने आपली जुनी फ्रेंचायजी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. तर शेन बाँडने राजस्थान रॉयल्सशी संधान बांधलं आहे.

राजस्थान रॉयल्सने आज जाहीर केलं की न्यूझीलंडला माजी वेगवान गोलंदाज हा आता त्यांचा सहाय्यक प्रशिक्षक आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. ते आपला पदभार आयपीएल 2024 च्या हंगामापासून सांभाळतील. शेन बाँडने मुंबई इंडियन्सपूर्वी न्यूझीलंड संघाचे देखील 2012 ते 2015 दरम्यान बॉलिंग कोच पद भुषवले आहे.

न्यूझीलंडचा संघ 2015 च्या आयसीसी वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचला होता. त्यानंतर शेन बाँड हा आयपीएल 2015 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. त्याच्या कार्यकाळात मुंबईने चार आयपीएल टायटल जिंकले.

शेन बाँडच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सच्या काही नावाजलेल्या गोलंदाजांनी मैदान गाजवलं. त्यात जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्लनेघन, ट्रेंट बोल्ट आणि अजून काही टी 20 स्पेशलिस्ट गोलंदाजांची नावे घेता येतील.

न्यूझीलंडचा 48 वर्षाचा माजी वेगवान गोलंदाज आता राजस्थान रॉयल्ससोबत काम करणार आहे. राजस्थानकडे प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्म, कुलदीप सेन, ओबेड मॅकॉय, केएस आसिफ, कुलदीप यादव अशा युवा वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे.

शेन बाँड आरआरमध्ये दाखल झाल्यानंतर क्रिकेट डायरेक्टर कुमार संगकारा म्हणाला, 'आधुनिक क्रिकेटमधील शेन बाँड हा एक ग्रेट वेगवान गोलंदाज होता. त्याच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे. त्याच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. त्याने आयपीएल आणि भारतात अनेक वर्षं आपलं योगदान दिलं आहे. तो सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कायम आग्रही असतो. त्याचे आमच्या फ्रेंचायजीमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT