Rajasthan Royals Drop Retain Player Yashasvi Jaiswal esakal
IPL

RR vs LSG : राजस्थानने रिटने केलेला प्लेअर केला 'ड्रॉप'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होत आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या संघात दोन बदल केले आहेत. यातील राजस्थानच्या संघाने केलेल्या बदलाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. राजस्थान रॉयल्सने आपला रिटेन (Retain) केलेला खेळाडू यशस्वी जैसवालला (Yashasvi Jaiswal) संघातून वगळले. राजस्थानने त्याला 4 कोटी रूपये देऊन रिटेन केले होते.

राजस्थानने आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले आहे. त्यांनी अपयशी सलामीवीर यशस्वी जैसवालच्या जागी वॅन डेर डुसेनला (Rassie van der Dussen) संधी दिली आहे. त्यामुळे जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने राजस्थानची सलामी दिली. याचबरोबर राजस्थानने नवदीप सैनीला देखील बेंचवर बसवले आहे. त्याची जागा कुलदीप सेन घेणार आहे. लखनौ सुपर जायंटने देखील आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी लुईस आणि टायच्या जागी मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि चमिराला संधी दिली आहे. स्टॉयनिस संघात परतल्याने लखनौची बॅटिंग अधिकच मजबूत झाली असून त्यांना बॉलिंगमध्येही स्टॉयनिसचा हात आजमावता येईल.

सध्या गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट हा चार पैकी 3 सामने जिंकून 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थानने आपल्या 3 सामन्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मात्र राजस्थान आजच्या सामन्यात विजय मिळवून लखनौची जागा घेण्याच्या प्रयत्नात असेल. तर लखनौला आजचा सामना जिंकून थेट पॉईंट टेबलच्या टॉपवर पोहचण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT