RajasthanRoyals  Sakal
IPL

VIDEO : राजस्थानची स्टंटबाजी; जर्सी लॉन्च करण्याचा नवा फंडा

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने आपली नवी जर्सी लॉन्च केली. याआधी काही संघांनी आपल्या जर्सी लॉन्च केल्याचे पाहायला मिळाले. पण राजस्थानी थाट काही औरच. राजस्थान रॉयल्सने जर्सी लॉन्चसाठी खास आयोजिन केले होते. मंगळवारी संघाने यंदाच्या हंगामासाठी नवी जर्सी लॉन्च केली.

जर्सी लॉन्चिंगचा त्याच्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियन स्टंट परफॉर्मर रॉबी मॅडिसन (Robbie Maddison) याने चार चांद लावल्याचे पाहायला मिळाले. त्याने जयपूरच्या रस्त्यावरुन स्टंटबाजी करत सवाई मानसिंग स्टेडियमवर खास एन्ट्री मारली. त्याची ही स्टंटबाजी क्रिकेट चाहत्यांना आवाक करणारी अशीच आहे.

राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात रॉबी मॅडिसन एक सीक्रेट पार्सल उचलताना दिसते. त्यानंतर तो आपल्या बाईकवरुन जयपूरच्या गल्ली बोळातून पोलिसांना चकवा देत स्टंटबाजी करत स्टेडियमवर पोहचल्याचे दाखवण्यात आले आहे. तो बाईकसह स्टेडियमच्या छतवरुन थेट मैदानात एन्ट्री मारतो. याठिकाणी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, युजवेंद्र चहल हे देखील दिसतात. राजस्थानने या व्हिडिओच्या माध्यमातून जर्सी लॉन्च करण्याचा नवा फंडा दाखवून दिलाय.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT