RR vs CSK Live esakal
IPL

RR vs CSK : राजस्थानने चेन्नईचा केला 32 धावंनी पराभव

अनिरुद्ध संकपाळ

RR vs CSK Live : राजस्थानने ठेवलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडूनऋतुराज गायकवाड (47) आणि शिवम दुबे (52) यांनी झुंजार फलंदाजी केली. मात्र सीएसकेला 20 षटकात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. राजस्थानकडून अॅडम झाम्पाने 3 तर रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. फलंदाजीत यशस्वी जैसवालने धडाकेबाज फलंदाजी करत 77 धावा ठोकल्या होत्या.

राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर कोणालाही 200 धावाचा टप्पा पार करता आला नव्हता तो आज राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. यशस्वीनंतर ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 35 धावांची खेळी करत राजस्थानला 202 धावा करण्यात मोठा हातभार लावला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने दोन विकेट्स घेतल्या.

पडिक्कल - जुरेल जोडीने 

देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनी आरसीबीचा डाव सावरत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली.

132-3 : चेन्नईचे जोरदार पुनरागमन 

यशस्वी जैसवालने धडाकेबाज खेळी करत राजस्थानला पहिल्या 10 षटकात 100 धावांपर्यंत पोहचवले. मात्र त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांना जोरदार पुनरागमन केले. तुषार देशपांडेने 14 व्या षटकात कर्णधार संजू सॅमसनला 17 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. त्यानंतर याच षटकात 43 चेंडूत 77 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैसवालला माघारी धाडत राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लावला.

RR 100-1 : यशस्वीचे अर्धशतक, आरआरची शंभरी

सलामीवीर यशस्वी जैसवालने पहिल्या षटकातील आपला धडाका संपूर्ण पॉवर प्ले कायम ठेवत नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने जॉस बटलरसोबत 8 षटकात 86 धावांची सलामी दिली. त्यात बटलरचा वाटा 27 धावांचा होता. बटलर बाद झाल्यानंतर यशस्वीने संजू सॅमसनसोबत राजस्थानचे 10 व्या षटकात शतक धावफलकावर लावले.

यशस्वी जैसवालचा धमाका

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैसवालने आकाश सिंहच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत दमदार सुरूवात केली.

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT